Shocking Video | भरधाव रेल्वेची गायीला जोरदार धडक! पण देव तारी त्याला कोण मारी, पाहा नेमकं काय घडलं?
ही घटना घडली एका नाल्याच्या पुलावर. भरधाव ट्रेनच्या धडकेचा जोरदार मार गायीला लागला. ट्रेनच्या धडकेनंतर गाय पुलावरुन थेट खाली कोसळली. यानंतर गायीनं आपला मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहिला.
मृत्यू (Death) अटळ आहे. पण तो कधी येणार हे कुणालाच माहीत नसतं. मृत्यू सांगून येत नाही. इतकंच काय तर काळ आणि वेळ दोन्ही एकत्र आल्याशिवाय मृत्यूला थारा नाही. यातील एक जरी चुकलं,तरी मृत्यू चुकलाच समजा.
असाच एक अंगावर काटा आणणार व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ (Video) आहे एका गायीचा. ज्यात एका भरधाव ट्रेननं गायीला प्रचंड जोरदार धडक दिली खरी. पण त्यानंतर जे झालं, ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.
काळजाचा ठोका चुकेल!
इन्स्ट्राग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. या व्हिडीओमध्ये एका गायीला भरधाव ट्रेननं समोरुनच जोरदार धडक दिली. ही घटना घडली एका नाल्याच्या पुलावर. भरधाव ट्रेनच्या धडकेचा जोरदार मार गायीला लागला. ट्रेनच्या धडकेनंतर गाय पुलावरुन थेट खाली कोसळली. यानंतर गायीनं आपला मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहिला असेल.
काळ आला होता, पण…
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, ही म्हण गायीच्या बाबतीत खरी ठरली. ट्रेनच्या धडकेनंतर गायीचा तोल पूर्णपणे गेला. गाय नाल्यात रेल्वेच्या धडकेइतक्याच जोरात खाली कोसळली. पण आश्चर्यकारकरीत्या गाय बचावली. पाण्यात पडून गाय पुलाच्या खांबांना आधार घेऊन एका बाजूला थांबली. थोडक्यात गायीचा जीव वाचला. यानंतर गाय आपल्या चारही पायांवर सुखरुप पुन्हा उभी राहिल्याचं दिसून आलंय. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अवघ्या काही सेकंदात हे सगळं घडलं.
व्हायरल झालेला व्हिडीओ khannoor30621 यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ‘जाको राखे सांईयां, मार सके ना कोय‘ असं म्हणत युजरनं या व्हिडीओला कॅप्शन दिलंय. 30 लाखापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
दरम्यान, अनेकदा जनावरं रेल्वे ट्रॅकवर नकळपणे येतात. रेल्वेच्या येण्याचा त्यांना कोणताही अंदाज न आल्यानं अनेक जनावरांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. चक्क पुलावरच गाय कशी काय पोहोचली, यावरुही काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. समोर रेल्वे ट्रॅकवर जनावर दिसल्यानंतर भरधाव रेल्वेला अचानक ब्रेक लावणंही शक्य नसतं. त्यामुळे गायीला धडक देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय रेल्वेचालकापुढे नव्हता. गायीला धडक दिल्यानं तिचा निश्चितच मृत्यू झालेला असणार, असं रेल्वे चालकालाही वाटलं असेल. पण देव तारी, त्याला कोण मारी, याचा साक्षात्कार हा व्हिडीओ पाहिल्यावर सगळ्यांना आलाय.