Trending Video Indore: नवरदेव, वऱ्हाड, घोडा सगळं त्या ताडपत्रीखाली! हायो रब्बा हायो रब्बा करत मुसळधार पावसात लग्नाची मिरवणूक!
मुसळधार, धो धो पाऊस कोसळत असताना लोकांनी नवरदेवाची वरात काढलीये. इतक्या पावसात स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळ्या वरातींनी डोक्यावर ताडपत्री घेतलीये. ज्याला नाचायचंय तो त्या ताडपत्री बाहेर येऊन नाचतो.
इंदौर: मान्सूनचं (Monsoon) जबरदस्त आगमन झालेलं आहे. गेल्या दोन दिवसात तर जोरदार पाऊस चालू झालाय. पाऊस काय थांबायचं नाव घेईना. पण पावसामुळे लोकं नेहमीची कामं सोडून देतो का आपण? नाही. काही गोष्टींना आपण पावसाळ्यात नक्कीच कट मारतो पण काही गोष्टी कराव्याच लागतात. पण लग्नसमारंभ हा कुठल्या प्रकारात मोडतो हे समजणं जरा कठीण आहे. एक व्हिडीओ इतका व्हायरल होतोय की व्हिडीओ बघून लग्न आणि खासकरून लग्नाची वरात अत्यंत महत्त्वाची आहे असं दिसून येतं. व्हिडीओ आहे मध्यप्रदेशातील इंदौर मधला. इंदौर मध्ये एका लग्नाची मिरवणूक काढण्यात आलीये. बरं आता ही मिरवणूक काय साधीसुधी नाही बरं! एकदम हटके आहे. मुसळधार, धो धो पाऊस कोसळत असताना लोकांनी नवरदेवाची (Groom) वरात काढलीये. इतक्या पावसात स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळ्या वरातींनी डोक्यावर ताडपत्री घेतलीये. ज्याला नाचायचंय तो त्या ताडपत्री बाहेर येऊन नाचतो. गाणं, बँड, बँजो हे सगळं त्या ताडपत्रीच्या आत. सगळं एकदम भर पावसात मस्त चाललंय! अशी काय होती लग्नाची आणि त्या मिरवणुकीची हे आता त्या नवरदेवालाच माहित पण व्हिडीओ मात्र तुफान व्हायरल (Viral Video OF Marriage) झालाय हे नक्की!
मुसळधार पाऊस वऱ्हाडी मंडळींचं काहीच बिघडवू शकला नाही
देशातील अनेक भागात मान्सूनने दणका दिला आहे. पावसाने लोकांना उष्णतेपासून दिलासा दिला असला तरी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अजूनही लोक जोरदार मान्सूनच्या पावसाची ‘आतुरतेने’ वाट पाहत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात लग्ने सहसा होत नसली तरी मुसळधार पावसात निघालेली मिरवणूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. बरं, मुलाचं लग्न होतं, त्याला कसं तरी लग्नात पोहचायचंच होतं पण वऱ्हाडी मंडळी? त्यांनाही लग्नात जेवायला जायचंच होतं. मुसळधार पाऊस सुद्धा वऱ्हाडी मंडळींचं काहीच बिघडवू शकला नाही.
व्हिडिओ पहा:
This called pure #dedication #Barat #Indore ?? pic.twitter.com/0AyZxVzRE2
— शैलेंद्र यादव (@ShailenderYadu) July 6, 2022
व्हिडिओ मध्यप्रदेशातील इंदौरमधील
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जोरदार पाऊस पडत आहे आणि त्याच पावसात मिरवणूक सुरू झाली आहे. काही पाहुणे नाचत नाचत पुढे चालत आहेत, तर मागे, ताडपत्री घेतलेले अनेक लोक मिरवणुकी सोबत चालतायत. मुसळधार पावसाने कहर केला असला तरी मिरवणुकांचा उत्साह कमी होत नाहीये. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील इंदौरमधील आहे. अशा ठिकाणी जाणं तर दूरच अशी मिरवणूक सुद्धा तुम्ही क्वचितच पाहिली असेल. यातील विशेष बाब म्हणजे घोड्यावर स्वार होणारा नवरदेव ताडपत्रीखाली होता आणि लग्नाची मिरवणूकही ताडपत्रीखाली होती. ही मिरवणूक लोकांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे.