दुर्घटनेत हात-पाय गेले, नियतीने साथ सोडली, पण ‘तिने’ नाही, डोळ्यांमध्ये पाणी आणणारी प्रेम कहाणी

सना प्रेमात पडली तेव्हा त्या प्रेमासोबत तिच्या पदरात त्रास, दु:खही आलं. मात्र, ती त्या त्रासाला आणि नियतीपुढे झुकली नाही (True Love story of Dawood and Sana)

दुर्घटनेत हात-पाय गेले, नियतीने साथ सोडली, पण 'तिने' नाही, डोळ्यांमध्ये पाणी आणणारी प्रेम कहाणी
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 3:57 PM

लाहोर : आपण प्रेमाच्या अनेक कथा वाचल्या असतील किंवा अशा अनेक घटना आजूबाजूला आपण बघत असतो. बऱ्याचदा प्रेम होतं, लग्न होतं आणि अवघ्या काही दिवसांमध्ये घटस्फोटही होतो. अशा भरपूर घटना घडताना आपण बघत असतो. प्रेमात त्याग असतो, सन्मान असतो आणि जोडीदारी काळजी घेणं देखील जरुरीचं असतं. खरंतर ती जबाबदारीच असते. मात्र, आजकाल बरेच लोक जबाबदारी म्हटले की लांब पळतात. पण काही लोक जबाबदारी इतकं लिलया पेलतात की संपूर्ण जग त्यांच्यासमोर नतमस्तर होतं. अशाच एका जबाबदार मुलीची, जबाबदार जोडीदाराची आणि प्रेरणादायी युगुलाची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (True Love story of Dawood and Sana).

पाकिस्तानच्या सना नावाच्या तरुणीने आज लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. त्यामागील कारण देखील तसंच आहे. सना प्रेमात पडली तेव्हा त्या प्रेमासोबत तिच्या पदरात त्रास, दु:खही आलं. मात्र, ती त्या त्रासाला आणि नियतीपुढे झुकली नाही. तिने त्या दु:खाला आपलं मानत नियतीशी दोन हात करायचं ठरवलं. तिच्या या धाडसामुळे सना आज जगभरात नावाजली आहे. अनेक लोक सनाच्या मदतीसाठी धावून येत आहेत (True Love story of Dawood and Sana).

नेमकं प्रकरण काय?

सना आणि दाऊद यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात दाऊदच्या कुटुंबियांनी सना आणि तिच्या कुटुंबियांना घरी जेवणासाठी निमंत्रण दिलं होतं. दोघांच्या लग्नाची धावपळ सुरु होती. लग्न जुळवण्याचं काम सुरु होतं. मात्र, नियतीने भलतंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. ज्या रात्री सना आणि तिचे कुटुंबिय दाऊदच्या घरी येणार होते त्याच रात्री दाऊद एका विजेच्या खांब्याला धडकला. या दुर्घटनेत दाऊद पूर्णपणे जळाला. त्यानंतर दाऊदला बर्न युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी जे सांगितलं त्याने अनेकांना मोठा धक्का बसला. दाऊदला जिवंत ठेवायचं असेल तर त्याचे दोन्ही हात आणि एक पाय कापावा लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. दाऊदच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पण अखेर दाऊदचे दोन्ही हात आणि एक पाय कापावा लागला.

सनाने हिंमत सोडली नाही

सनाला दाऊदच्या दुर्घटनेविषयी जशी माहिती मिळती तशी ती आपल्या चुलत बहिणीसोबत रुग्णालयात दाखल झाली. दाऊदची अवस्था बघून ती हैराण झाली. तिने दाऊदच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर दाऊदने डोळे उघडले. दाऊदला खरंतर चिंता होती. आता या दुर्घटनेमुळे सना आपल्याला स्वीकारेल की सोडून जाईल? असा प्रश्न त्याला सतावत होता. कारण त्याच्या बाजूच्या बेडवर असलेल्या रुग्णाच्या पायाचा एक बोट कापला गेल्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीने लग्न मोडलं होतं. पण सनाने तसं केलं नाही. दाऊदला सोडणार नाही, असं सनाने ठरवलं. दाऊद वाचणार नाही, असं जवळपास दीड महिने डॉक्टर सांगत होते. पण सनाने हिंमत सोडली नाही.

लग्नासाठी सनाच्या कुटुंबियांचा विरोध

दरम्यान, सनाच्या कुटुंबियांनी दाऊदसोबत लग्न करण्यास नकार दिला. मात्र, सनाने हार मानली नाही. तिने दाऊत सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर दाऊदची सेवा करण्याची शपथच तिने जणू घेतली. दोघांनी चर्चमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्न करणं फार कठीण होतं. अखेर दोघांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. सना आणि दाऊदची ही प्रेम कहाणी ऐकून जगभरातील अनेक लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

हेही वाचा : Video : मोहम्मद शमीच्या पत्नीचा ‘रावडी’ अंदाज, अक्षय कुमारच्या गाण्यावर ‘असे’ एक्सप्रेशन…!

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.