Video | उंची 20 इंच, वजन 26 किलो, ‘राणी’ला पाहण्यासाठी लोकांची गर्दी, जगातील सर्वांत लहान गाय असल्याचा दावा
ही गाय जगातील सर्वात छोटी असल्याचा दावा करण्यात येत असून तिची उंची अवघी 20 इंच तर वजन 26 किलो आहे.
मुंबई : आपल्या भोवतालचे जग हे अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे. निसर्गाच्या किमयेमुळे आपल्याला रोजच अद्भूत असे अविष्कार पाहायला मिळतात. सध्या एक गाय जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. ही गाय जगातील सर्वात छोटी असल्याचा दावा करण्यात येत असून तिची उंची अवघी 20 इंच तर वजन 26 किलो आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथून काही अंतरावर असलेल्या एक फार्महाऊसमध्ये या गाईला ठेवण्यात आले आहे. (Twenty inch tall Cow found Bangladesh Dhaka owner claimed it as worlds smallest cow)
उंची अवघी 20 इंच, वजन 26 किलो
सध्या चर्चेचा विषय ठरलेली गाय ही सर्वांत लहान असल्याचे सांगितले जात आहे. या गाईचं नाव राणी असून तिला भुट्टी गाय म्हटलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार ही एक भुटानी जातीची गाय आहे. ही गाय बांगलादेशची राजधानी ढाकाजवळच्या चारीग्राम येथील एका फार्महाऊसमध्ये ठेवण्यात आली आहे. तिचं वजन हे सर्वांत कमी असल्याचा दावा केला जातोय. ही गाय दोन वर्षांची असून तिची उंची 20 इंच तर लांबी 26 इंच आहे. तसेच तिचे वजन अवघे 26 किलो आहे.
जगातील सर्वात लहान गाय अल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार सध्याची जगातील सर्वांत लहान गाय ही भारतातील केरळमध्ये आहे. तिचे वजन हे 40 किलो असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, आता या राणी म्हणजेच भुट्टी गाईचे वजन फक्त 26 किलो असल्याचे समोर आल्यामुळे हीच गाय सर्वांत लहान असल्याचा दावा केला जातोय. राणी गाईच्या मालकाने माझ्याकडे सर्वांत लहान गाय असल्याचा दाव करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगामी तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी या गाईची तपासणी करणार आहेत.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, अवघ्या 20 इंच एवढी उंची असलेली गाय पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. ही गाय पाहण्यासाठी लोक जगभरातून बांगलादेशात जात आहेत. या गाईची होत असलेली चर्चा पाहून तिचा मालकसुद्धा तिची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे.
इतर बातम्या :
Video | वर्कआउट करताना हेमांगी कवीचा ठुमकत ठुमकत डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Video | चिमुकल्याच्या डान्सने उडवली धम्माल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ऐकावे ते नवलच! वधूच्या डोक्यावर तोडले जातात पापड, पहा या अनोख्या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ
(Twenty inch tall Cow found Bangladesh Dhaka owner claimed it as worlds smallest cow)