AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: दोन वळू महामार्गावरच भिडले! मारामारी करता करता डायरेक्ट डिव्हायडरवर, प्रवासी घाबरले, गाड्या थांबल्या

कुस्ती करताना, एकमेकांना भिडताना हे वळू सगळ्या रस्त्यावर इकडे तिकडे होताना दिसतायत. लोकांना अक्षरशः जवळ जाण्याची देखील हिंमत होत नाही. त्यांनी नगर मनमाड महामार्गाला आपल्या कुस्तीचा आखाडा बनवलेला दिसून येतोय.

Viral Video: दोन वळू महामार्गावरच भिडले! मारामारी करता करता डायरेक्ट डिव्हायडरवर, प्रवासी घाबरले, गाड्या थांबल्या
Valu FightImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 11:12 AM

नाशिक: प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात. कधी भांडताना, कधी मस्ती करताना, कधी काय करताना तर कधी काय करताना. मागे एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात दोन काळवीटं समृद्धी महामार्गावर धावत होती. तो व्हिडीओ इतका व्हायरल झाला होता की त्या व्हिडिओत जणू काही हरीण शर्यतीत पळतायत की काय असा प्रश्न पडला होता. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो नगर मनमाड महामार्गावरचा (Nagar-Manmad Highway) आहे. ज्यात दोन वळू एकमेकांना चांगलेच भिडलेत. त्यांच्या भांडणात रस्त्यावरची सगळी ट्राफिक (Traffic) थांबलीये. लोकं वाट बघतायत की कधी ह्यांचं भांडण थांबतंय आणि कधी पुढे जाता येतंय. या एकमेकांना भिडलेल्या वळूचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कुस्ती करताना, एकमेकांना भिडताना हे वळू सगळ्या रस्त्यावर इकडे तिकडे होताना दिसतायत. लोकांना अक्षरशः जवळ जाण्याची देखील हिंमत होत नाही. त्यांनी नगर मनमाड महामार्गाला आपल्या कुस्तीचा आखाडा बनवलेला दिसून येतोय.

भांडता भांडता हायवेच्या डिव्हायडरवर

व्हिडिओत एक पांढऱ्या रंगाचा वळू आणि एक काळ्या रंगाचा वळू दिसून येतोय. हे एकमेकांच्या शिंगाला शिंगं लावून उभे आहेत. येणारे जाणारे प्रवासी त्यांच्याकडे बघतायत पण जवळ जायची हिंमत काय कुणी करत नाही. अर्धा तास ही कुस्ती चालू असते. भांडता भांडता ते फूटपाथच्या डिव्हायडर वर जाताना दिसून येतायत. तिथेच महामार्गावर या दोन वळू व्यतिरिक्त अजूनही मोकाट प्राणी पाहायला मिळतायत. इथल्या नागरिकांना हा रोजचा त्रास आहे.

नागरिकांना नेहमीच याचा त्रास

येवल्यातील फत्तेबुरुज नाका परिसरात नगर-मनमाड महामार्गावर दोन वळू एकमेकात भिडले असल्याने वळुंची झुंजीमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहन चालकांना सावधगिरीने वाहन काढण्याची वेळ येत होती. तर या वळूच्या झुंजीमुळे काही वाहनधारकांनी लांबच थांबलेले होते. जवळपास अर्धा तास या वळूंची झुंज महामार्गावर चालू होती. शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे झाले असून अशा प्रकारे वळू कुठेही एकमेकास भिडतात यामुळे नागरिकांना नेहमीच याचा त्रास सहन करावा लागत असतो.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.