नाशिक: प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात. कधी भांडताना, कधी मस्ती करताना, कधी काय करताना तर कधी काय करताना. मागे एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात दोन काळवीटं समृद्धी महामार्गावर धावत होती. तो व्हिडीओ इतका व्हायरल झाला होता की त्या व्हिडिओत जणू काही हरीण शर्यतीत पळतायत की काय असा प्रश्न पडला होता. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो नगर मनमाड महामार्गावरचा (Nagar-Manmad Highway) आहे. ज्यात दोन वळू एकमेकांना चांगलेच भिडलेत. त्यांच्या भांडणात रस्त्यावरची सगळी ट्राफिक (Traffic) थांबलीये. लोकं वाट बघतायत की कधी ह्यांचं भांडण थांबतंय आणि कधी पुढे जाता येतंय. या एकमेकांना भिडलेल्या वळूचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कुस्ती करताना, एकमेकांना भिडताना हे वळू सगळ्या रस्त्यावर इकडे तिकडे होताना दिसतायत. लोकांना अक्षरशः जवळ जाण्याची देखील हिंमत होत नाही. त्यांनी नगर मनमाड महामार्गाला आपल्या कुस्तीचा आखाडा बनवलेला दिसून येतोय.
व्हिडिओत एक पांढऱ्या रंगाचा वळू आणि एक काळ्या रंगाचा वळू दिसून येतोय. हे एकमेकांच्या शिंगाला शिंगं लावून उभे आहेत. येणारे जाणारे प्रवासी त्यांच्याकडे बघतायत पण जवळ जायची हिंमत काय कुणी करत नाही. अर्धा तास ही कुस्ती चालू असते. भांडता भांडता ते फूटपाथच्या डिव्हायडर वर जाताना दिसून येतायत. तिथेच महामार्गावर या दोन वळू व्यतिरिक्त अजूनही मोकाट प्राणी पाहायला मिळतायत. इथल्या नागरिकांना हा रोजचा त्रास आहे.
येवल्यातील फत्तेबुरुज नाका परिसरात नगर-मनमाड महामार्गावर दोन वळू एकमेकात भिडले असल्याने वळुंची झुंजीमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहन चालकांना सावधगिरीने वाहन काढण्याची वेळ येत होती. तर या वळूच्या झुंजीमुळे काही वाहनधारकांनी लांबच थांबलेले होते. जवळपास अर्धा तास या वळूंची झुंज महामार्गावर चालू होती. शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे झाले असून अशा प्रकारे वळू कुठेही एकमेकास भिडतात यामुळे नागरिकांना नेहमीच याचा त्रास सहन करावा लागत असतो.