घागरा घालून डान्स करणारे दोन Yotubers, डोला रे डोला गाण्यावर डान्स!
हे गाणं येऊन दोन दशकं लोटली तरी आजही हे गाणं जिवंत आहे. लोक सतत या गाण्याच्या डान्स स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करतात.
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या देवदास या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांना डोला रे डोला या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना तुम्ही पाहिलं असेल. हे गाणं येऊन दोन दशकं लोटली तरी आजही हे गाणं जिवंत आहे. लोक सतत या गाण्याच्या डान्स स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडीओमध्ये एक कॅनेडियन आणि भारतीय माणूसही सामील झाला आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर घागरा घालून या दोघांनी डोला रे डोला या गाण्यावर डान्स केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या लोकांची इन्स्टाग्राम रील प्रचंड व्हायरल होत आहे. यात भारताचा जानिल मेहता आणि कॅनडाचा ॲलेक्स वोंग हे रंगबेरंगी घागऱ्यात देवदासच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर ते अनवाणी पायाने या गाण्यावर नाचलेत. व्हिडिओमध्ये त्यांच्या स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स परफेक्ट दिसत आहेत. आतापर्यंत 1,77,871 लोकांनी त्याचा व्हिडिओ लाईक केला आहे. गाण्यावरच्या नृत्यात त्यांची ऊर्जा दिसून येत होती.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- “यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित नेने कोण आहेत?”
View this post on Instagram
सोशल मीडिया यूजर्स, विशेषत: भारतीय, इतर देशांमध्ये भारतीय नृत्य पाहून खूप उत्सुक होते. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी त्यांच्या डान्सचं जोरदार कौतुक केलं. पाठीमागून येणाऱ्या जाणाऱ्यांवर त्यांच्या या डान्सचा काहीही परिणाम झालेला नाही. असंही लोक म्हणतायत.
आणखी एका युझरने लिहिले, ‘हा माझा आवडता बॉलिवूड चित्रपट आहे, तुम्ही लोकांनी कमाल केली.’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘हा इन्स्टाग्राम ऑडिओ माझ्या देशात बंद आहे पण ऑडिओशिवायही मला समजले की तू देवदास चित्रपटातील डोला रे डोलावर डान्स करत आहेस’.