इस्लामाबाद: सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ इतके मजेदार असतात की लोकांना ते आवडले की लोक ते इतरांना सुद्धा पाठवतात. विरंगुळा म्हणून आजकाल हे व्हिडीओ बघितले जातात. यात अनेक प्रकार असतात. कधी कुणी गाणं म्हणताना व्हिडीओ व्हायरल होतो. कधी कुणाचा डान्स व्हायरल होतो. कधी प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी लहान मुलांचे. व्हिडीओचे अनेक प्रकार त्यात प्लॅटफॉर्म्सचे सुद्धा अनेक प्रकार. सोशल मीडिया हा जणू काही समुद्रच आहे. हा समुद्र सगळ्यांसाठी सारखाच आहे. या समुद्रात अनेक देश, अनेक लोक आहेत. आता बघा ना पाकिस्तानचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तिकडे लाईव्ह टीव्हीवर दोन लोकांमध्ये वाद झाला आणि आता हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय.
टीव्हीवर बातम्यांच्या चॅनलवर तुम्ही लाईव्ह डिबेट पाहिलीच असेल. पाकिस्तानात एका लाईव्ह डिबेट दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय. दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये डिबेट सुरु होती आणि प्रकरण इतकं वाढलं की त्यांनी मारामारीच सुरु केली. हा व्हिडीओ बघून लोकं खूप हसतायत. टीव्हीवर एखाद्या विषयावर चर्चा सुरु असताना, वादविवाद सुरु असताना वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांचा अपमान करतात त्यांच्यात शाब्दिक चकमक होते हे तर आपण नेहमीच पाहत आलोय. पण कधी यावरून मारामारी झालेली पाहिलीये का? ती सुद्धा लाईव्ह! मग हा व्हिडीओ बघा…
Kalesh b/w Two Party workers on Live TV during debate over Imran khan in Pakistan pic.twitter.com/t1KgQs6ye5
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 28, 2023
या व्हिडीओ मध्ये एक कार्यकर्ता इम्रान खानवर टीका करतोय तर दुसरा त्याचा बचाव करतोय. टीका करणारा म्हणतो, “इम्रान खान कसाई आहे”, दुसरा या वाक्यावर भडकतो. हा वाद इतका वाढतो की कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही की आपण टीव्हीवर दिसतोय. वाद टोकाला जातात आणि तिथे अँकर उपस्थित असताना, लाईव्ह शो मध्ये कार्यकर्ते आपसांत मारामाऱ्या करतात. हा व्हिडीओ बघून तुम्हाला खूप हसू येईल. तुम्ही आजवर असे अनेक लाईव्ह डिबेट शो पाहिले असतील पण क्वचितच असं दृश्य पाहिलं असेल.