पंजाब : दो दिल एक जान, हा डायलॉग तुम्ही आजपर्यंत अनेकदा ऐकला असले मात्र एक शरीर दोन जीव असे उदाहरण आपर्यंत पाहिले नसेल. पंजामध्ये दोन शरीराने जोडलेल्या जुळ्या भावांना त्यांच्या आई-वडिलांनीही सोडून दिले, आता त्यांना पंजाब सरकारने नोकरी दिली आहे. जुळे भाऊ सोहना आणि मोहना आता पंजमधील स्टेट पावर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करताना दिसून येणार आहेत. त्यांना दर महिन्याला 20 हजार पगारही मिळणार आहे.
ख्रिसमसच्या तोंडावर पंजाब सरकारचे गिफ्ट
पंजाबमधील अमृतसरमध्ये सोहना-मोहना या जुळ्या भावांना पंजाब सरकारने ख्रिसमसच्या तोंडावर मोठे गिफ्ट दिले आहे. हे दोघे अमृतसरमधील डेंटल कॉलेजजवळील पावरहाऊसमध्ये मेंटेनन्स कर्मचारी म्हणून काम करणार आहेत. 11 डिसेंबरलाच सोहना-मोहनाला अपॉईंटमेंट लेटर दिले आहे. सोहना-मोहनाचा जन्म 14 जून 2003 ला दिल्लीतल्या सुचेता कृपलानी रुग्णालयात झाला आहे. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जन्मानंतर गरिबीमुळे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सोडून दिले. त्यानंतर डॉक्टरांनी पिंगलवाडा चॅरिटेबल ट्रस्टला संपर्क केला आणि या नवजात बालकांना 2003 मध्ये डोक्यावर छत मिळाले. एकाच्या जीवाला धोका होता, त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी वेगळे केले नव्हते.
Amritsar | Conjoined twins, Sohna and Mohna, bag a job in the Punjab State Power Corporation Limited (PSPCL)
“We’re very glad about the job & have joined on Dec 20. We thank the Punjab govt & the Pingalwara institution, which schooled us, for the opportunity,” they say pic.twitter.com/vNieE4jBiJ
— ANI (@ANI) December 23, 2021
20 हजार पगाराची नोकरी मिळाली
सोहना-मोहनाला आता महिन्याला 20 हजार पगाराची नोकरी मिळाली आहे. दोघांनी याचवर्षी इलेक्ट्रीक डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी एका कंपनीत ज्यूनिअर इंजिनियरच्या पदासाठीही अर्ज केला होता. त्याचे शरीर जोडलेले असले तरी दोन हृदय, दोघांची वेगळी मान, हात वेगवेगळे आहेत, मात्र लीवर, पित्ताशय जोडलेले आहे. दोघांना नोकरी मिळाल्याने दोघे आनंदाने भारावून गेले आहेत, त्यांनी त्यासाठी पंजाब सरकारचे आभारही मानले आहेत. आम्ही पूर्ण इमानदारी आणि मेहनतीने काम करू असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी त्यांचे पालन केलेल्या संस्थेचेही आभार मानले आहेत.