Video | निरागस चिमुकल्याचे बोबडे बोल, 17 सेकंदाच्या गायत्री मंत्राला ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध, व्हिडीओ पाहाच
सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी लहान मुलाची वाहवा करत असून त्याने म्हटलेला गायत्री मंत्र सर्वांनाच आवडला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. व्हायरल झालेले काही व्हिडीओ हे थरारक असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी लहान मुलाची वाहवा करत असून त्याने म्हटलेला गायत्री मंत्र सर्वांनाच आवडला आहे. (two year old children sitting heart touching gayatri mantra video went viral on social media)
व्हिडीओमध्ये काय आहे ?
सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा दोन वर्षीय मुलाचा आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारा मुलगा गायत्री मंत्र उच्चारतो आहे. नीट बोलता येत नसले तरी हा मुलगा मंत्र उच्चारण्याचा प्रयत्न करतोय. गायत्री मंत्र म्हणताना या मुलाचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलाय. व्हिडीओ रेकॉर्ड करणारे कदाचित त्याचे पालक असावेत. छोटा मुलगा ज्या ठिकाणी चुकतो आहे, तेथे त्याचे पालक मुलाला मार्गदर्शन करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
दो साल के बच्चे ने सुनाया गायत्री मंत्र pic.twitter.com/S8RlG5q0ao
— @kumarayush (@kumarayush084) July 27, 2021
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुलाचे बोबडे बोल ऐकून तसेच गायत्री मंत्र उच्चारताना त्याच्यातील तन्मयता सर्वांनाच भावली आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या छोट्या मुलाचा व्हिडीओ पाहून सगळेच मंत्रमुग्ध झाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडीओला शेअरसुद्धा केले आहे. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kumarayush084 या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
इतर बातम्या :
Video | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा
Video | भोजपुरी गाण्यावर चिमुकली थिरकली, जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल
Video | दहा वर्षाच्या मुलीवर लांडग्याचा अचानकपणे हल्ला, छोट्याशा कुत्र्याने वाचवलं, व्हिडीओ व्हायरल
(two year old children sitting heart touching gayatri mantra video went viral on social media)
पुराचं भयानक वास्तव ! 16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित; अंदाजे 43 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षितhttps://t.co/v3QLYo7u0D#Flood | #Rain | #MaharashtraFloods |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 27, 2021