सिंधुदुर्ग : सावंवाडीतील माडखोल धरणावर मजामस्ती करणे दोन युवकांना चांगलेच महागात पडले आहे. धरणावर गेल्यानंतर हे दोन्ही युवक वाहून जात असल्याचा प्रकार घडला. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून या दोन्ही युवकांचे प्राण वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. सध्या हे दोन्ही युवक सुखरुप आहेत. (two young boys drown in dam people rescued the successfully)
मिळालेल्या माहितीनुसार मौज आणि मस्ती करण्यासाठी दोन युवक सिंधुदुर्गमधील सावंतवाडीतील माडखोल धरणावर गेले होते. यावेळी सुरुवातीला एक तरुण धरणाच्या पाण्यात वहून गेला. आपला सहकारी वाहून जात असल्याचे पाहून दुसऱ्या युवकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात दुसरा मुलगासुद्धा पाण्याच्या प्रवाहात पडला. तसेच हे दोन्ही युवक पाण्यात वाहून जात होते.
ही घटना घडल्यानंतर दोन्ही युवकांना वाचवण्यासाठी इतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या युवकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, पाण्याचा जोर वाढत असल्यामुळे बचावकार्यात व्यत्यय येत होता. मात्र, असे असले तरी स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्यानं बचाव कार्यास सुरुवात केली.
पाहा व्हिडीओ :
एकजण बुडत असताना दुसऱ्या युवकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहून गेले. ग्रामस्थांच्या मदतीनं या युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र, अशा धक्कादायक घटना घडत असल्यामुळे राज्यात प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच धरण, तलाव अशा ठिकाणी जाणे टाळावे, असेही पोलीस तसेच बचाव पथकाकडून सांगितले आहे.
इतर बातम्या :
शेतीच्या वादावरून कुटुंबावर सशत्र हल्ला, तीन जण गंभीर जखमी, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार
अमरावतीत कोरोनाचा धोका वाढला, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल, ‘या’ वेळेत राहणार सुरु
(two young boys drown in dam people rescued the successfully)