विजेच्या वेगाने, शक्तिमान से भी तेज या माणसाचं टाइपिंग स्पीड! व्हिडीओ बघाच
बिल बनवताना माणूस किती पटकन टाईप करतो हे या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओ पाहताना तुम्ही तुमच्या पापण्या झाकेपर्यंत हा माणूस धडाधड टाईप करतो. या व्हिडिओमध्ये मेडिकल दुकानातील कर्मचारी विजेच्या वेगाने टायपिंग करताना दिसत आहे.
मुंबई: तुम्ही सोशल मीडियाचा वापर वारंवार करता का? मग लोकांना विचारात टाकणारे धक्कादायक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या प्रचंड वेगाने टायपिंग करणाऱ्या एका व्यक्तीच्या एका भन्नाट क्लिपने सर्वांना चकीत केले आहे. बिल बनवताना माणूस किती पटकन टाईप करतो हे या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओ पाहताना तुम्ही तुमच्या पापण्या झाकेपर्यंत हा माणूस धडाधड टाईप करतो. या व्हिडिओमध्ये मेडिकल दुकानातील कर्मचारी विजेच्या वेगाने टायपिंग करताना दिसत आहे. औषधांचा कोड टाईप करताच त्याची बोटे पटापट वळू लागतात, बघून आश्चर्य वाटतं.
संगणकावर विजेच्या वेगाने टायपिंग करणारी व्यक्ती
तो एक-एक करून औषधाची प्रिस्क्रिप्शन घेऊन पटकन आपल्या संगणकावर तपशील लिहिताना दिसत आहे. तो इतका चपळ आहे की त्याला हे टाईप करण्यासाठी कीबोर्ड बघण्याचीही गरज नसते. ही लोकप्रिय क्लिप भारतातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा माणूस कशा प्रकारे वेगात टाईप करत राहतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून खूप आश्चर्य वाटले. ही व्यक्ती अशा पद्धतीनं टाईप करते यावर कुणाचाही विश्वास बसत नाही.
This receptionist at a busy pharmacy in India. pic.twitter.com/lYk80QQGav
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 13, 2023
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. @cctvidiots नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 40 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा रिसेप्शनिस्ट भारतातील एका व्यस्त फार्मसीमध्ये आहे.”