Cheetah | झरकन शिकारीवर घालतो झडप..पण दुसरेच करतात याचे बछडे गडप..वेगाच्या बादशाहची काय ही लाचारी…

Cheetah | शिकारीवर झडप घालत तिचा फडशा पाडणारा वेगाचा बादशाह चित्ता, पण त्याच्या वेगाचा हा फायदा त्याच्या बछड्यांना वाचवताना मात्र होत नाही. काय आहे त्याची लाचारी..

Cheetah | झरकन शिकारीवर घालतो झडप..पण दुसरेच करतात याचे बछडे गडप..वेगाच्या बादशाहची काय ही लाचारी...
चित्त्यावर इतर प्राण्यांची कुरघोडीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 12:36 PM

नवी दिल्ली : आफ्रिकेतील नामिबिया(Namibia) देशातून 8 चित्ते (cheetah) भारतात आणण्यात आले आहे. 70 वर्षांपूर्वी भारतातून चित्ता नामशेष झाला होता. चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोडले.

Project Cheetah या अतंर्गत चित्त्यांचे भारतात संरक्षण करण्यात येणार आहे. त्यांचा अधिवास सुरक्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे मोठे पाऊल म्हणावे लागेल.

भारतात 1952 मध्ये चित्ता हा विलुप्त म्हणून घोषीत करण्यात आला. शिकारीमुळे तो भारतातून नामशेष झाला होता. 1948 मध्ये सर्वात शेवटी छत्तीसगडच्या जंगलात चित्त्याचे दर्शन झाले होते.  ताशी 100 किलोमीटर धावण्याचा वेग हे त्याचे खास वैशिष्ट्ये आहे.

हे सुद्धा वाचा

चित्ता सर्वसाधारणपणे 12 वर्षे जगतो. जंगलात उमद्या, तरुण चित्त्याचे आयुष्य कठिण असते. मादीपेक्षा नर चित्ता कमी जगतो. जंगलात चित्ता सर्वसाधारणपणे केवळ 8 वर्षेच जगू शकतो. वर्चस्ववादाच्या लढाई, कुरघोडी यामुळे ते गंभीर जखमी होतात आणि त्यातच गतप्राण होतात.

राष्ट्रीय उद्यान आणि जंगली प्राण्यांसाठी राखीव उद्यानात चित्त्याचे बछडे दीर्घकाळ जगत नाहीत. त्यांचा मृत्यूदर अन्य प्राण्यांच्या पिल्लांपेक्षा अधिक आहे. त्यांच्या बछड्यांचा मृत्यू दर तब्बल 90 टक्के आहे.

वेगाच्या हा बादशाह शिकार करण्यात माहिर समजल्या जातो. पापणी लवती न लवती तोच तो विद्युतगतीने शिकारीचा फडशा पाडतो. पण त्याच्या पिल्लांची शिकार त्याला थांबवता येत नाही. वाघ, सिंह, लांडगे आणि कोल्हे त्याच्या पिल्लांची शिकार करतात.

चित्त्याचे वजन 38 ते 65 किलो दरम्यान असते. नर चित्ता हा मादा चित्त्यापेक्षा आकाराने मोठा असतो. त्याचे डोके मोठे असते. चित्ता लांबीला 45 ते 55 इंच असतो. तर त्याची शेपूट 33 इंच लांब असते.

या विद्युतगतीने धावणाऱ्या प्राण्याचा रंग आकर्षक दिसतो, सोनेरी रंगावर काळे मोठे ठिपके आकर्षक दिसतात. इतर प्राण्यांपेक्षा हे ठिपके वेगळे असतात. चित्त्याची नजर मोठी तीक्ष्ण असते. तो लपण्यातही माहिर असतो. या गुणांमुळेच तो जंगलातील मोठा शिकारी ठरतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.