Team India मध्ये डेब्यू करण्याआधी हा क्रिकेटपटू UPSC परीक्षा पास झाला होता, कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी UPSC परीक्षेत यशस्वी झाला. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले कारण त्याने अवघ्या 45 चेंडूत 57 धावा केल्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यूपीएससीची परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते आणि लाखो विद्यार्थी UPSC ची परीक्षा देतात, पण त्यातील काही मोजकेच विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी होतात. आपण अशा एका क्रिकेटपटूबद्दल बोलणार आहोत जो टीम इंडियाची जर्सी घालण्यापूर्वी UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाला. आम्ही बोलत आहोत 1972 मध्ये जन्मलेल्या अमय खुरासियाबद्दल.
भारताचा हा माजी फलंदाज मध्य प्रदेशचा असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती. अमय खुरासिया सध्या कस्टम आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात तैनात आहेत.
अमय खुरासियाने अगदी लहान वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि वयाच्या 17 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अमय खुरासिया यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाला. अमय खुरासिया यांनी १९ साली पेप्सी चषक स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध टीम इंडियाकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
पदार्पणाच्या सामन्यातच त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले कारण त्याने अवघ्या 45 चेंडूत 57 धावा केल्या, पण खुरासियाला इतर सामन्यांमध्ये आपला चांगला फॉर्म राखण्यात अपयश आले आणि यामुळे काही वर्षांनंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली.
अमय खुरासियाने भारताकडून फक्त 12 वनडे सामने खेळले आणि 149 धावा केल्या. खुरासियाने आपला शेवटचा सामना 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.
खुरासियाने मध्य प्रदेशकडून 119 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 7000 पेक्षा जास्त धावा केल्या. खुरासिया यांनी 22 एप्रिल 2007 रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.