VIDEO: उर्वशी रौतेला ऋषभ पंतशी लग्न करणार ?, मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर दोन शब्दांत उत्तर
Rishabh Pant-Urvashi Rautela: उर्वशी रौतेला हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घेतलेल्या मुलाखतीत तिला अडचणीत आणणारा प्रश्न विचारण्यात आला. मुलाखत घेणाऱ्या मुलाखतकाराने चाहत्यांकडून आलेल्या एक संदेश वाचून दाखवला.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत धमाकेदार फलंदाजीमुळे चर्चेत असतो. आयपीएलमध्ये आपली फटकेबाजी तो दाखवत आहे. काही काळापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ऋषभ पंतमुळे चर्चेत आली आहे. आता दोघांच्या संबंध आणि लग्नासंदर्भात एका मुलाखतीत उर्वशीला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सुरुवातीला ती जरा अस्वस्थ दिसून आली. त्यानंतर तिने दोन शब्दांत या प्रश्नाचे उत्तर दिले. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या कॉमेंट करत आहेत. उर्वशी आणि ऋषभ 2022 मध्ये खूपच डेटच्या अफवांमुळे चर्चेत आले होते.
उर्वशीने असे दिले उत्तर
उर्वशी रौतेला हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घेतलेल्या मुलाखतीत तिला अडचणीत आणणारा प्रश्न विचारण्यात आला. मुलाखत घेणाऱ्या मुलाखतकाराने चाहत्यांकडून आलेल्या एक संदेश वाचून दाखवला. त्यात म्हटले होते की, ऋषभ तुमचा आदर करतात. ते तुम्हाला आनंदात ठेवतील. तुम्ही त्याच्याशी लग्न कराल तर आम्हाला आनंद होईल. या मेसेजचा स्क्रीन शॉटही त्या मुलाखत घेणाऱ्याने शेअर केला. यावर उर्वशी हिने थोड वेळ घेतला. त्यानंतर दोन शब्दात उत्तर दिले. ‘नो कमेंट’.
काय होते यापूर्वी झालेले प्रकरण
दोन वर्षांपूर्वी उर्वशी आणि ऋषभ एक दुसऱ्यांना डेट करत असल्याची बातमी आली होती. परंतु ती अफवा होती. त्यानंतर दोघांना एकमेकांना व्हॉट्सअॅप ब्लॉक केल्याचे म्हटले जात होते.
Urvashi Rautela talking about comments on marrying Rishabh Pant in a latest podcast 😵
Video Credits @filmygyan #ipl pic.twitter.com/1Ps5s3xvk2
— Riseup Pant (@riseup_pant17) May 3, 2024
2022 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी म्हणाली, मी वाराणसीमध्ये शूटिंगसाठी आली होती. दहा तास शूटिंग केल्यावर मी हॉटेलमध्ये पोहचली. मी खूप थकली होती. त्यामुळे मला लागलीच झोप आली. त्यावेळी आरपीने मला 17 कॉल केले होते. मला चांगले वाटले नाही. त्यानंतर मी त्याला फोन करुन सांगितले की, तू जेव्हा मुंबईत येणार ते आपण भेटू. परंतु तोपर्यंत ही गोष्टी माध्यमांपर्यंत आली होती. त्यावेळी उर्वशी हिने आरपी हा उल्लेख ऋषभ पंतसाठी केल्याचे म्हटले गेले.