Vande Bharat Viral Video : वंदे भारत की पॅसेंजर, व्हिडिओ पाहून लोकांना बसला धक्का, प्रीमियम वंदे भारत अन् ट्रेनमध्ये आता…

Vande Bharat Viral Video : ट्विटवर हा व्हिडिओ आल्यानंतर चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. त्यावर युजर्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला आहे. रेल्वे स्थानकावर मेट्रोसारखी प्रणाली लागू करा, असे एका युजर्सने लिहिले आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, वंदे भारत ट्रेनसाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती करा.

Vande Bharat Viral Video : वंदे भारत की पॅसेंजर, व्हिडिओ पाहून लोकांना बसला धक्का, प्रीमियम वंदे भारत अन् ट्रेनमध्ये आता...
vande bharat
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 7:10 AM

Vande Bharat Viral Video : देशातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या वंदे भारत ट्रेन पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या सुविधा अन् तिच्या वेगामुळे प्रवासी वंदे भारत ट्रेनला प्राधान्य देऊ लागले आहेत. या ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये एखाद्या पॅसेंजर ट्रेनसारखी गर्दी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये झालेली दिसत आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये तिकीट कन्फर्म नसेल तर त्या गाडीत प्रवेश नसतो, परंतु ही गर्दी पहिल्यावर सर्व नियम पायदळी तुडवले दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी रेल्वे मंत्रालयावर टीकेचे आसूड ओढले आहेत.

काय आहे त्या व्हिडिओमध्ये

वंदे भारत ही प्रीमियम ट्रेन आहे. त्या ट्रेनसंदर्भात Gems of Engineering या युजरने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. डेहराडून ते लखनऊ दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओ ट्विट करताना युजरने लिहिले आहे की, प्रीमियम वंदे भारत इतर रेल्वेसारखी झाली आहे. आम्हाला कठपुतळी रेल्वेची गरज नाही, आम्हाला नवीन रेल्वे हवी आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या कोचमध्ये इतकी गर्दी दिसत आहे की, त्यातून रस्ता काढणेही अवघड होत आहे. एखाद्या आंदोलनावरुन परतलेल्या लोकांनी वंदे भारतमध्ये घुसखोरी केल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

युजर्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस

ट्विटवर हा व्हिडिओ आल्यानंतर चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. त्यावर युजर्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला आहे. रेल्वे स्थानकावर मेट्रोसारखी प्रणाली लागू करा, असे एका युजर्सने लिहिले आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, वंदे भारत ट्रेनसाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती करा. आणखी एकाने नवीन रेल्वे मंत्र्यांची मागणी केली आहे.

वंदे भारत ट्रेन ही नवीन युगाची ट्रेन म्हटली जात आहे. या ट्रेनमध्ये सध्या सिटींग प्रणालीच उपलब्ध आहे. आता लवकरच स्लीपर वंदे भारत येणार आहे. स्लीपर वंदे भारत सुरु होण्यापूर्वीच सिटींग गाडीतील ही परिस्थिती पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.