स्क्रीन लावली, खुर्च्या टाकल्या… चक्क स्मशानात 5 दिवस ‘भूतांना’ दाखवला चित्रपट, अखेर हैराण करणारा प्रकार नेमका…
ऐकावे ते नवलच म्हटल्याप्रमाणे एक प्रकार उघडकीस आलाय. आपण सर्वजण साधारणपणे घरात टीव्हीसमोर बसून किंवा सिनेमा हॉलमध्ये जाऊन चित्रपट पाहतो. फार फार तर सर्व मित्र वगैरे जमली असतील तर प्रोजेक्टरवर चित्रपट पाहतो. मात्र, एक हैराण करणारा प्रकार उघडकीस आलाय.
आपण सर्वजण साधारणपणे घरात टीव्हीसमोर बसून किंवा सिनेमा हॉलमध्ये जाऊन चित्रपट पाहतो. फार फार तर सर्व मित्र वगैरे जमली असतील तर प्रोजेक्टरवर पाहतो. जर तुम्हाला मोकळे आकाश आणि जिथे कोणीच नाही, अशा ठिकाणी चित्रपट पाहण्याची संधी मिळाली तर कसे वाटेल? चक्क मोकळे आकाश, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आणि खाण्या पिण्याचीही व्यवस्था करून खास भूतांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आल्याचा एक वेगळाच प्रकार उघडकीस आलाय, होय तुम्ही खरे ऐकले. चक्क भूतांसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली.
हा सर्व प्रकार थायलंडमध्ये घडलाय. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, थायलंडमधील स्मशानभूमीत मृतांसाठी चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल पाच दिवस भूतांसाठी स्क्रीनिंग ठेवण्यात आली. यामध्ये 2 जून ते 6 जून दरम्यान भूतांना चित्रपट दाखवण्यात आला. हा स्क्रीनिंगचा कार्यक्रम ,सवांग मेट्टा थम्मस्थान फाउंडेशनने आयोजित केला होता.
थायलंडच्या नाखोन रत्चासिमा येथील स्मशानभूमीत हा कार्यक्रम झाला. या स्मशानभूमीमध्ये तब्बल 3 हजार कबरी आहेत. चित्रपट पाहण्यासाठी खास खुर्च्या देखील तिथेच भूतांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. आत्म्यांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी हे केले गेल्याचे देखील सांगितले जात आहे.
रिपोर्टनुसार हे आत्मे कथितपणे थायलंडमध्ये राहणाऱ्या चिनी लोकांचे वंशज होते आणि ते कधीच चीनला परत जाऊ शकले नाहीत. हेच नाहीतर हे स्क्रीनिंग रात्री 7 सुरू झाले आणि रात्री उशीरापर्यंत सुरू होते. स्मशानभूमीचे चार कर्मचारी देखील तिथे उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
मृतांसाठी खास जेवण आणि कपड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जातंय. आता थायलंडमध्ये झालेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. खरोखरच भूत चित्रपट पाहण्यासाठी आले होते का? हा प्रश्न देखील एकीकडे उपस्थित केला जातोय. तर एकीकडे या प्रकारानंतर टीका देखील केली जात आहे.