Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोबराच्या विषापेक्षा 100 पट घातक या लहान जीवचे विष, पायांचा बोटापेक्षा छोट

King Cobra: समुद्रात आढळणाऱ्या प्राण्याचा आकार खूपच लहान आहे. तो सुमारे 1 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो. त्याचे शरीर पारदर्शक आहे. त्यामुळे पाण्यात तो दिसू शकत नाही. जवळजवळ अदृश्य असतो. व्यक्ती जेव्हा समुद्रात पोहण्यासाठी जातात, तेव्हा तो दंश मारतो.

कोबराच्या विषापेक्षा 100 पट घातक या लहान जीवचे विष, पायांचा बोटापेक्षा छोट
King CobraImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
Follow us
| Updated on: Apr 01, 2025 | 10:09 AM

King Cobra: जगात अनेक विषारी साप आहेत. त्यात सर्वात विषारी साप किंग कोबरा असल्याचे अनेकांना माहीत आहे. किंग कोबरा जगातील सर्वात विषारी साप आहे. एकवेळेस 20 लोकांचा मृत्यू होऊ शकतो इतके विष किंग कोबरा सोडतो. किंग कोबरा 18.5 फूटापर्यंत लांब असू शकतो. परंतु प्राण्याचा आकारच सर्व काही नसतो. जगात किंग कोबरापेक्षा जास्त घातक जीव आहेत. हा जीव आपल्या पायांच्या बोटांपेक्षाही लहान आहे. परंतु त्याचे विष किंग कोबरापेक्षा शंभर पट विषारी आहे.

इरुकांजी जेलीफिश सर्वात घातक

इरुकांजी जेलीफिश (Irukandji Jellyfish) हा जीव किंग कोबरापेक्षा जास्त घातक आहे. हा जीव ऑस्ट्रेलियामधील उत्तर भागात मिळतो. जेलीफिश त्याच्या विषारी दंशामुळे ओळखला जातो. त्याचा दंश जीवघेणाच असतो. त्याला जगातील सर्वात घातक दर्जा दिला गेला आहे. इरुकांजी जेलीफिशने दंश केल्यास व्यक्तीला होणाऱ्या वेदना खूप तीव्र आणि असह्य असतात. त्या अनेक दिवस होतात. त्याला ‘इरुकांजी सिंड्रोम’ म्हणतात. यामुळे पीडित व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होतो. तो नैराश्यात जातो आणि त्याला आत्महत्येचे विचारही येतात.

पारदर्शक असल्यामुळे दिसत नाही…

समुद्रात आढळणाऱ्या प्राण्याचा आकार खूपच लहान आहे. तो सुमारे 1 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो. त्याचे शरीर पारदर्शक आहे. त्यामुळे पाण्यात तो दिसू शकत नाही. जवळजवळ अदृश्य असतो. व्यक्ती जेव्हा समुद्रात पोहण्यासाठी जातात, तेव्हा तो दंश मारतो. जोपर्यंत त्याला ते कळते तोपर्यंत त्याचे विष संपूर्ण शरीरात पोहचलेले असते.

हे सुद्धा वाचा

Irukandji Jellyfish

जेलीफिशचे विष इतके शक्तिशाली आहे की ते एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी पुरेसे आहे. इरुकाजी जेलीफिशच्या विषावर कोणतेही औषध किंवा उतारा नाही. त्यामुळे तो आणखी घातक ठरतो. जेलीफिश सागरी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो सागरी परिसंस्था राखण्यास मदत करतो. समुद्रातील लहान मासे आणि प्लँक्टन नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे जैवविविधता राखली जाते.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.