आयकर शंभर टक्के वाचवा? भन्नाट आयडियाचा हा व्हिडिओ व्हायरल

How to save tax : व्हिडिओमध्ये श्रीनिधी हांडे म्हणतात की, आयकर १०० टक्के कसा वाचवावा, या बाबतची युक्ती मी तुम्हाला सांगणार आहे. तीन टप्प्यात या आयडियावर काम करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला गवत लावायचे आहेत.

आयकर शंभर टक्के वाचवा? भन्नाट आयडियाचा हा व्हिडिओ व्हायरल
viral video
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 3:15 PM

How to save tax : आयकर परतावा दाखल करण्याची मुदत ३१ जुलै रोजी आहे. त्यासाठी आता काही तास उरले आहेत. ३१ जुलैनंतर जुन्या योजनेतून आयकर परतावा करता येणार नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदारांना आयकर मर्यादा वाढवण्याची अपेक्षा होती. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन योजनेत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली आहे. ही मर्यादा 50 हजारवरुन 75 हजार करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक नोकरदार आयकर वाचवण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. परंतु त्यांना आयकर वाचवता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात शंभर टक्के आयकर कसा वाचवा? हे सांगितले आहे.

व्हिडिओ चांगलाच व्हायरल

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ टाकणाऱ्या श्रीनिधी हांडे यांनी आयकरसंदर्भात मजेशीर व्हिडिओ टाकला आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात आयकर वाचवण्याचा जो फंडा सांगितला आहे, ते पाहून व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याला लाखो लाईक मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे त्या व्हिडिओमध्ये

व्हिडिओमध्ये श्रीनिधी हांडे म्हणतात की, आयकर १०० टक्के कसा वाचवावा, या बाबतची युक्ती मी तुम्हाला सांगणार आहे. तीन टप्प्यात या आयडियावर काम करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला गवत लावायचे आहेत. गवत लावणे हे अवघड नाही. तुमच्या घराची बाल्कनी किंवा गच्चीवरसुद्धा तुम्ही गवताची शेती करु शकता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तुम्ही तुमच्या कंपनीच्या एचआरला जाऊन सांगा की, तुम्हाला पगार नको. त्यामुळे एचआर आनंदी होईल. परंतु पगाराऐवजी तुमच्याकडील गवत कंपनीने विकत घ्यावे.

म्हणजे तुमचे वेतन ५० हजार असेल तर गवताच्या ५० पेंढ्या कंपनीला द्या. एका पेंढीचे हजार रुपये दर पकडला तरी तुमचा पगार पूर्ण निघणार आहे. यामुळे तुमचे वेतनद्वारे मिळणारे उत्पन्न शून्यावर येईल. दुसरीकडे गवत विकून तुम्ही जे उत्पन्न मिळवले आहे, ते तुमच्या शेतीचे उत्पन्न गृहीत धरले जाईल. देशात शेती उत्पन्नावर कोणताही कर नाही. त्यामुळे तुम्ही शंभर टक्के आयकर वाचवू शकतात. त्यामुळे इतर गुंतवणूक करण्याचे झंझट राहणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Shrinidhi Hande (@enidhi)

यूजरच्या अनेक प्रतिक्रिया

व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर युजरकडूनही मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भारतीय लोक कोणताही जुगाड करू शकतात. दुसऱ्या युजरने ग्रॉस सॅलरीला ग्रास सॅसरी (गवताचा पगार) असे म्हटले आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, सरकारी कार्यालयात काम करत असल्यास ते गवताचे काय करणार? एकाने Old Regime ❌, New Regime ❌, Grass Regime ✅ असे म्हटले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.