Video: ट्रेनने रिओचा मुंबई ते भुवनेश्वर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “रिओचा थाटच न्यारा”
डॉग रिओचे असं एक कुटुंब आहेत. त्यांनी त्याच्या कुत्रा रिओचे इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले आहे आणि बरेचदा त्याचे मजेदार व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात.
सध्याच्या इंटरनेच्या जगात बहुतेकजण सोशल मीडियावर आहे, जे नेहमी स्वत:ला अपडेट ठेवतात, पण आता फक्त माणूसच नाही तर त्यांचे पाळीव प्राणी देखील सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. तुम्ही सर्वांनी अनेकदा कुत्र्यांची इन्स्टाग्राम खाती पाहिली असतील. खरं म्हणजे या कुत्र्यांचे मालक त्यांचे सोशल मीडिया अकाउंट तयार करतात आणि त्यावर त्यांच्याशी संबंधित सामग्री पोस्ट करतात. डॉग रिओचे असं एक कुटुंब आहेत. त्यांनी त्याच्या कुत्रा रिओचे इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले आहे आणि बरेचदा त्याचे मजेदार व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. रिओच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच व्हिडिओ आणि फोटो आहेत. alabnamed_rio नावाने रिओचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. (Video documenting dog train journey from Mumbai to Bhubaneswar goes viral)
यावर ते त्याचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट केली आहे, ज्यात रिओ हा ट्रेनमध्ये मुंबई ते भुवनेश्वर प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कधीकधी रिओ झोपलेला दिसतो, कधी खिडकीच्या बाहेर पाहत असतो. हा व्हिडीओ सर्वांना खूप आवडत आहे आणि आम्हाला खात्री आहे की ज्यांना कुत्रे खूप आवडतात, त्यांना हा व्हिडीओ नक्की आवडेल. हा व्हिडिओ 1 ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आला होता. तसेच, रिओच्या पालकांनी कॅप्शनमध्ये लिहिले – माझा मुंबई ते भुवनेश्वर प्रवास.
व्हिडीओ पाहा:
View this post on Instagram
आतापर्यंत या व्हिडीओला 20 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच, सोशल मीडिया युजर्स कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये करताना विचारले, ‘ही कोणती ट्रेन आहे? कोणार्क एक्सप्रेस ??? (कोणार्क एक्सप्रेस) मला माझ्या कुत्र्यासह मुंबईहून भुवनेश्वरला जायचे आहे. दुसर्याने लिहिले – मी माझ्या 2 वर्षांच्या GR सह प्रथमच प्रवास करणार आहे. याशिवाय अनेकांनी इमोजीज वापरुन आपली भावना व्यक्त केली आहे.
हेही वाचा:
Video: डोळ्यावर गॉगल, हातात ट्रॅक्टरचं स्टिअरिंग, आणि जोईचा भन्नाट स्वॅग, ट्रॅक्टर चालवणारा कुत्रा जगभरात का गाजतोय?
Video: बकरीच्या पिलासोबतचा सेल्फी व्हिडीओ बनवत होता, तितक्यात बकरीच्या पिलाने जे केलं, त्याने लोक लोटपोट झाले!