Nashik Toll Plaza Viral Video: नाशिकचा व्हिडीओ व्हायरल! महिलांमध्ये जुंपली, लोकांनी पटापट व्हिडीओ काढून घेतले
दोन महिला एकमेकांची कुटाई करताना दिसतायत. या महिला एकमेकांचे केस ओढताना दिसतायत. एकेमकांना मारताना दिसतायत. दरम्यानच्या काळात या त्यांच्या भांडणात कुणीही सहभाग घेतला नाही.
टोल नाक्यावरचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. दोन महिला एकमेकांची कुटाई करताना दिसतायत. या महिला एकमेकांचे केस ओढताना दिसतायत. एकेमकांना मारताना दिसतायत. दरम्यानच्या काळात या त्यांच्या भांडणात कुणीही सहभाग घेतला नाही. महाराष्ट्रातील नाशिकमधून हा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ नाशिकच्या पिंपळगाव टोल प्लाझाचा (Toll Plaza Viral Video) आहे. भांडणाऱ्या या महिलांमध्ये (Women Fight Video) एक महिला प्रवासी आहे आणि दुसरी टोल प्लाझावर काम करणारी कर्मचारी आहे. दोन्ही महिला एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. मारहाणी दरम्यान एकही जण मध्ये येऊन भांडण थांबवायचा प्रयत्न करत नाही.
व्हिडीओ
A shocking incident has come to light that a fierce fight took place between women at the Pimpalgaon toll booth near Nashik. @IGPNashikRange pic.twitter.com/1PwGTugSqo
— ??.ℝ?? ???? (@Rajmajiofficial) September 15, 2022
दोन महिलांमध्ये काही मिनिटे भांडण सुरू होते. आजूबाजूच्या काही लोकांनी लांबून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला तर अनेकजण या भांडणाचे व्हिडीओ मोबाईलवर काढताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ श्री राज माजी नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नाशिकजवळ पिंपळगाव टोल बूथवर महिलांमध्ये जोरदार भांडण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.” ही लढाई कशी अनावश्यक होती आणि ती कशी रोखता आली असती हे त्यांनी सांगितले.
इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने लिहिले की, ‘प्रत्येकजण व्हिडिओ बनवत आहे, भांडण थांबवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. आजकाल लोक भांडणं थांबवण्याऐवजी व्हिडिओ बनवणं पसंत करतायत.