रिक्षा गोलगोल फिरत होती, आपोआप! चालकाविना! हो! VIDEO
एका बाजारात रस्त्यावरील दृश्य पाहून काही लोक घाबरले आणि त्यांना वाटले की कदाचित रिक्षात भूत असेल.
रस्त्यावरील अपघातांचे किंवा वाहनाच्या धडकेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत, पण विचार करा की गाडी किंवा मोटार चालकाशिवाय धावत असेल तर? एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक रिक्षा चालकाविना रस्त्यावर गोलगोल फिरताना दिसत आहे. वास्तविक ही घटना महाराष्ट्रातील रत्नागिरी मधली आहे. इथल्या एका बाजारात रस्त्यावरील दृश्य पाहून काही लोक घाबरले आणि त्यांना वाटले की कदाचित रिक्षात भूत असेल.
लोकांनी पाहिले की, एक रिक्षा चालकाविना रस्त्यावर फिरत राहते. ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. लोक मोबाइलवरून व्हिडिओ बनवू लागले.
लोकांच्या काही लक्षात येईना की असं होतंय कशामुळे? काही लोकांनी ही रिक्षा थांबवायलाही सुरुवात केली पण ती थांबवता आली नाही आणि ती फिरत राहिली.
Autorickshaw free from election rally. pic.twitter.com/Qndv5DfNzd
— Raghav Masoom (@comedibanda) December 2, 2022
अखेर गर्दीतील काही लोक पुन्हा आले आणि त्यांनी बराच प्रयत्न करून रिक्षा थांबवली. चांगली गोष्ट म्हणजे या काळात कोणालाही इजा झाली नाही.
शेवटपर्यंत चालकाविना रिक्षा रस्त्यावर कशी फिरते आहे, हे लोकांना समजत नव्हते. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. नंतर या रिक्षाचे स्टेअरिंग लॉक झाल्याचे आढळून आले.
स्टिअरिंग लॉकमुळे रिक्षा चालकाविना सुमारे दोन मिनिटे रस्त्यावर फिरली. सध्या त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.