Video : वरातीवेळीच नवरदेवाची पॅन्ट फाटली! लग्नात उपस्थित लोकही पोट धरुन हसले

तुम्ही हा व्हिडीओ GHANTAA नावाच्या पेजवर शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ चांगलाच पसंत पडला आहे. ते हा व्हिडीओ सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसंच ते लोक आपल्या माहितीगारांनाही यात टॅग करत आहेत.

Video : वरातीवेळीच नवरदेवाची पॅन्ट फाटली! लग्नात उपस्थित लोकही पोट धरुन हसले
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 2:18 PM

मुंबई : सोशल मीडिया (Social Media) हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला अनेक मजेशिर आणि गमतीशिर गोष्टी पाहायला मिळतात. लग्न-समारंभासाठी अनेक प्रकारची तयारी सुरु असते हे तुम्ही जाणताच. नवरदेव (Groom) असो वा नवरी (Bride), हे दोघेही लग्नाची तयारी आधीपासूनच तयार करत असतात. तसंच ती वेळ आणि काळ खास बनवण्यासाठी सर्वकाही केलं जातं. मात्र, इतकं होऊनही काही लोक असं काही करतात की ते कृत्य त्यांच्या अडचणीचं कारण बनतं, तर अनेकांना हसू येतं. आता जो एक व्हिडीओ समोर आलाय तो याच प्रकारातील आहे. लग्नासाठी बोहल्यावर चढलेल्या एका नवरदेवासोबत असंच काही घडलं, जेव्हा ऐन मोक्याच्या वेळी त्याची पॅन्ट फाटली.

नवरदेवाची ही अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेल्या व्हराडी मंडळींना हसू अनावर झालं. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहे. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. तुम्ही हा व्हिडीओ GHANTAA नावाच्या पेजवर शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ चांगलाच पसंत पडला आहे. ते हा व्हिडीओ सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसंच ते लोक आपल्या माहितीगारांनाही यात टॅग करत आहेत.

घोडीवर बसण्याच्या प्रयत्नात नवरदेवाची पॅन्ट फाटली!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की वरात निघत आहे, आजुबाजूचे लोक नाचगाण्यात मश्गूल आहेत. नवरदेव घोडीवर बसण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचवेळी त्याची पॅन्ट फाटते. त्यानंतर नवरदेव चांगलाच संतप्त झाल्याचं पाहायला मिळतं. तसंच तो रागारागाने आपल्या कुटुंबातील लोकांना दुसरी पॅन्ट घेऊन यायला सांगत आहे. नवरदेव असं बोलू लागताच लोकांना याबाबत माहिती मिळते आणि ते पोट धरुन हसू लागतात.

सोशल मीडियावर व्हिडीओला लाईक्सचा पाऊस

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सर्वजणही हा व्हिडीओ पाहून आपलं हसू रोखू शकणार नाही. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीलाही उतरत आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत हा व्हिडीओ दीड लाख लोकांनी लाईक केलाय. तसंच हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर हसणारी इमोजी टाकत आपली प्रतिक्रियाही दिलीय. लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर एका यूजरने कमेंट करत, दुल्हे साहब की तो चढ गई बारात, असं म्हटलं आहे.

इतर बातम्या :

Ira Khan | ख्रिसमस पार्टीत रोमँटिक झाली आमिर खानची लेक, बॉयफ्रेंड नुपूर शिखरेला Kiss करतानाचे फोटो चर्चेत!

Year Ender 2021 | आमिर खान-किरण राव ते समंथा-नागा चैतन्य, मनोरंजन विश्वातील ‘या’ जोड्यांनी घेतली फारकत!

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.