video : चोर आहे की ‘स्पायडर मॅन’, कल्पनेपलिकडचे दृश्य, चार मजल्याची इमारत चढला अन् उतरला देखील

हा चोर आहे की मस्करी, असा झपाझप उभी भिंत चढला केव्हा आणि उतरला केव्हा याचा पत्ताच लागला नाही. चोराचा व्हिडीओ पाहून लोक म्हणतायत चोर आहे की स्पायडरमॅन !

video : चोर आहे की 'स्पायडर मॅन', कल्पनेपलिकडचे दृश्य, चार मजल्याची इमारत चढला अन् उतरला देखील
spiderman chorImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 9:31 PM

मुंबई : सोशल मिडीयावर एका भन्नाट चोराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एखादा स्पायडरमॅन चित्रपटातील दृश्य पहायतो की काय असा भास हा व्हिडीओ पाहून आपल्याला येत आहे. हा सराईत चोर काही क्षणात उंच इमारतीच्या गच्चीवर जाऊन पुन्हा झर झर खाली उतरताना या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. या चोराची कला पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही इतका हा इमारतीची उभी भिंत चढण्यात तरबेज आहे.

व्हिडीओच्या सुरूवातीला एका खिडकीतील व्यक्तीची नजर या चोरावर पडते. तो या चोराचा लागलीच व्हिडीओ तयार करतो. त्याच्या खिडकीसमोरील इमारतीच्या गच्चीपर्यंत झर…झर…हा चोर लिलया चढत जातो. हा व्यक्ती त्या चोराचा व्हिडीओ बनवताना त्याला आवाजही देत आहे. त्यामुळे पुन्हा मोठ्या स्फूर्तीने हा चोर पुन्हा या इमारतीवरुन तितक्याच वेगाने झरझर खाली उतरताना दिसत आहे.

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्वीटरवर हा व्हिडीओ@gharkekalesh या अकाऊंटवरून शेअर झाला आहे. केवळ 53 सेंकदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 29 हजार 600 युजरनी पाहील्याचे दिसत आहे. युजर हा व्हिडीओ पाहून विविध प्रकारच्या प्रतिक्रीया देत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘किती मस्त फिटनेस आहे चोराचा, अन्य एका युजरने प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, ‘आम्ही दिल्लीवाले कधी सुधरणार नाही’ तर तिसऱ्या युजरने म्हटले आहे की चोर आहे की स्पायडर मॅन !

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.