Video | अरेच्चा! चक्क पतंगासोबतच तोही हवेत, असं कसं घडलं? हे पाहिल्यावर कळेल!

पतंगाच्या दोरीला माणूस कसाकाय लटकला, असा प्रश्न अनेकांना पडला होता. हा व्हिडीओ बराचवेळ हा माणूस पतंगाच्या दोरीला लटकून होता. खाली त्याचे मित्रमंडळी त्याला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडत होते.

Video | अरेच्चा! चक्क पतंगासोबतच तोही हवेत, असं कसं घडलं? हे पाहिल्यावर कळेल!
पंगताच्या दोरीला लटकलेला तरुण
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 4:23 PM

पतंगाच्या (Kite) दोरीसह एक माणूस हवेत उडाल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ट्विटरवरुन (Twitter) या घटनेचा व्हिडीओही (Video) शेअर करण्यात आला आहे. यात पतंगाच्या दोरीचा लटकलेल्या तरुणानं पतंग जसजशी जमिनीच्या जवळ आली, तशी खाली उडीही टाकली. यात पंतगाच्या दोरीला लटकलेला तरुण किरकोळ जखमी (Minor injuries) झाल्याचंही सांगितलं जातंय.

पंगताच्या दोरीला लटकलेला तरुण

नेमका कुठचा व्हिडीओ?

हा व्हिडीओ श्रीलंका ट्वीट नावाच्या एका वेरीफाईड ट्वीटर हॅन्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. २१ डिसेंबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा व्हिडीओ श्रीलंकेतूनच शेअर करण्यात आला होता.

पतंगाच्या दोरीला माणूस कसाकाय लटकला, असा प्रश्न अनेकांना पडला होता. हा व्हिडीओ बराचवेळ हा माणूस पतंगाच्या दोरीला लटकून होता. खाली त्याचे मित्रमंडळी त्याला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडत असल्याचंही ऐकायला मिळालंय.

पंगताच्या दोरीला लटकलेला तरुण

कशामुळे घडला प्रकार?

पतंगाचं वजन जास्त असल्यामुळे हवेत जेव्हा पतंग उडाली तेव्हा तिच्या दोरीसह हा माणूसही पतंगीच्या दोरीला लटकला. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही वजनदार पतंग जेव्हा हवेत उडू लागली होती, तेव्हा ती पकडण्यासाठी अनेकजण धावले. त्यातील एकानं या पतंगीचा दोर आपल्या हातात पकडून ठेवला. काहींनी पतंग उडून गेल्यानं तिच्या मागं धावणं सोडलं. मात्र पतंगाची दोर पकडून ठेवलेला एक जण या पतंगासोबत हवेत तरंगू लागला, असं सांगितलं जातंय. श्रीलंकेच्या जाफना परिसरातच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

…म्हणून तो थोडक्यात बचावला!

आपल्यासोबतचा एक माणूस हवेत पतंगासोबत उडाल्याचं पाहून सगळेच चक्रावले होते. त्यानंतर पंतंगीच्या दोरीसह उडालेल्या तरुणाला वाचवण्यासाठी काहींनी आरडाओरडा केला. पण वाऱ्याच्या झोतात पतंग आणखीनच वर-वर जाऊ लागली. मात्र एका क्षणी वाऱ्याचा वेग संथ झाल्यानंतर पतंग जमिनीच्या दिशेने येऊ लागल्यानंतर सुरक्षित अंतर पाहून या तरुणानं जमिनीवर उडी टाकली. यात तरुणाला किरकोळ इजा झाली असली तर त्याचा जीव मात्र बालंबाल बचावला आहे. या व्हिडीयोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

पाहा व्हिडीओ –

इतर ट्रेन्डिंग बातम्या

‘Chopsticks अशा वापरायच्या, डार्लिंग!’ Video पाहून लोक म्हणाले, ‘प्रेम असावं तर असं!’

घरात 11 लोक, एकानंही दिलं नाही ‘Vote’! पराभवानंतर ढसाढसा रडला संतोष

Video : 50 हजारात तयार झालेल्या जीपचा व्हिडिओ आनंद महिंद्रांकडून ट्विट, दिली मोठी ऑफर

घट्ट कपड्यांमुळे Spermमध्ये घट? टाईट जीन्स, ट्राऊझरसोबत आत घट्ट अंडरवेअर घालणाऱ्यांनो, हे वाचाच!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.