Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : बेधुंदपणे बागडणारं, फूटबॉल खेळणारं हत्तीचं पिल्लू, लोक म्हणाले, ‘याला पाहून आम्ही सगळं टेन्शन विसरलो’!

या व्हिडीओमध्ये हत्तीचं एक पिल्लू (Baby Elephant) कसरती करताना पाहायला मिळतं आहे. या व्हिडीओत हत्तीचं हे पिल्लू फूटबॉल खेळताना दिसत आहे.

Viral Video : बेधुंदपणे बागडणारं, फूटबॉल खेळणारं हत्तीचं पिल्लू, लोक म्हणाले, 'याला पाहून आम्ही सगळं टेन्शन विसरलो'!
या व्हिडीओत हत्तीचं हे पिल्लू फूटबॉल खेळताना दिसत आहे
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 7:25 PM

लहानपणी आपल्याला जेव्हा जंगलाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या, त्यात हत्तीचा उल्लेख आला नाही असं व्हायचं नाही. हत्तीच्या उल्लेखाविना या कहाण्या अधुऱ्या असायच्या. हत्ती खूप विशालकाय, महाकाय असतो असं मोठे नेहमी सांगायचे, हे सांगताना हत्ती किती करामती करतो हेही सांगितलं जायचं. व्हिडीओंमधून वा प्राणी संग्रहालयात गेल्यावर हत्तीच्या या करामती पाहायलासुद्धा मिळायच्या. त्यामुळेच आजच्या काळातही सोशल मीडियावर हत्तीच्या व्हिडीओंना खूप डिमांड असते. हत्तीचे मज+शीर आणि क्युट व्हिडीओ दररोज व्हायरल होतच असतात, जे व्हिडीओ पाहून कुणीही त्यांच्या प्रेमात पडतं. ( Video of a baby elephant playing football goes viral)

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीचं एक पिल्लू (Baby Elephant) कसरती करताना पाहायला मिळतं आहे. या व्हिडीओत हत्तीचं हे पिल्लू फूटबॉल खेळताना दिसत आहे. ते बेधुंदपणे बागडताना आपण पाहू शकतो. हा व्हिडीओ पाहून लोक खूश होत आहेत. या व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडलेला दिसतो आहे, कारण या व्हिडीओला अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट आणि शेअर करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ विक्रम पलावत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीचं हे पिल्लू फूटबॉल खेळताना, जोरात पळताना दिसतं आहे. व्हिडीओतील हत्तीचं हे पिल्लू इतकं खूश आहे, की याला पाहून तुम्ही तुमचा सगळा थकवा विसरुन जाल आणि आनंदी व्हाल. हे हत्तीचं पिल्लू पळून पळून फूटबॉलला आपल्या पायाने मारत आहे आणि पुन्हा त्यामागे पळत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ 20 सप्टेंबरला शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला आतापर्यंत हजारोवेळा पाहिलं गेलं आहे. एका नेटकऱ्याने यावर लिहलं, खरंच हे हत्तीचं पिल्लू आपल्याच धुंदीत मस्त आहे. तर दुसऱ्याने लिहलं, हत्तीच्या पिल्लाचं हे स्किल कमाल आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.