Video : बास्केट घेऊन भाजी खरेदी करणारा कुत्रा पाहिलाय का? भन्नाट व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका टॅलेंटेड कुत्र्याचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कुत्रा चक्क बास्केट घेऊन भाजी खरेदी करायला गेला आहे.

Video : बास्केट घेऊन भाजी खरेदी करणारा कुत्रा पाहिलाय का? भन्नाट व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 7:56 AM

माणसाचा सर्वात चांगला मित्र आणि इमानदार प्राणी म्हणून कुत्र्यांना ओळखले जाते, पण काही वेळा यांचा टॅलेंट पाहून माणसेही सरप्राईज राहतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका टॅलेंटेड कुत्र्याचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कुत्रा चक्क बास्केट घेऊन भाजी खरेदी करायला गेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता कुत्रेही खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाले आहेत असे तुम्हाला वाटेल. कारण कुत्रा ज्या पद्धतीने भाजी खरेदी करतोय, ज्या पद्धतीने माणूसही नाही खरेदी करत. या व्हिडिओला आतापर्यंत हाजारो लोकांनी पाहिले आहे.

व्हिडिओत नेमके काय?

मार्केटमध्ये फळे आणि बाजी खरेदी करणारा कुत्रा पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत, अनेकांनी हा व्हिडिओ पोस्ट करत, लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या व्हिडिओत कुत्रा बास्केट घेऊन भाजी मंडईत भाजीच्या स्टॉलवर जातो, तिथे जाऊन तो एका भाजीवर पाय ठेवतो, त्यानंतर भाजी विक्रेती ती भाजी त्याच्या बास्केटमध्ये टाकते. त्यानंतर बाजी विक्रेते त्याच्याकडून पैसे घेतात आणि उरलेले सुट्टे पैसे परत त्याच बास्केटमध्ये ठेवतात. त्यानंतर कुत्रा डब्बा उचलतो आणि मालकाच्या घरी परततो. या व्हिडिओतील कुत्र्याचा समजूतदारपणा पाहून सर्वच हैराण झाले आहेत.

कुत्र्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंटस

कुत्र्याच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती दिली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले आहे, असा भाजी खरेदी करतानाचा कुत्रा पहिल्यांदा पाहिला आहे, तर दुसऱ्याने लिहिले आहे. कुत्र्याला आणि कुत्र्याच्या मालकाला सॅल्यूट, तर काही नेटकरी माणूस किती स्वार्थी झाला म्हणत या व्हिडिओवर व्यक्त झाले आहेत. शॉपिंग करणाऱ्या या कुत्र्याचा व्हिडिओ naughtyworld या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला एक लाखापेक्षाही जास्त लाईक आले आहेत. या समजूत कुत्र्यांचे लोकांना चांगलेच कौतुक केले आहे. त्यामुळेच लोक हा व्हिडिओ त्यांच्या अकाउंटवरूनही शेअर करत आहे. त्यामुळे हा कुत्रा सोशल मीडियावर सध्या जोमात आहे.

Ratnagiri | Video | एकापाठोपाठ एक कुठं निघाले तारे? Video पाहून चकीत झाले सारे

Viral : आनंद महिंद्रांनी अनोख्या पद्धतीनं ख्रिसमसच्या शुभेच्छा देत व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले…

Viral : पॉकेटमनीतून पैसे वाचवत 6 वर्षाच्या मुलीनं घेतलं 5 कोटीचं पहिलं घर!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.