बदकाच्या पिलाच्या मदतीला जेव्हा छोटासा कुत्रा येतो, नेटकरी म्हणाले, ‘माणसं हे कधी शिकणार?’

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान कुत्रा बदकाला मदत करताना दिसतो आहे. काही जण या व्हिडिओला गोंडस म्हणत आहेत, तर काहीजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

बदकाच्या पिलाच्या मदतीला जेव्हा छोटासा कुत्रा येतो, नेटकरी म्हणाले, 'माणसं हे कधी शिकणार?'
Dog Helping a Duck
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 9:23 AM

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video ) होतात. माणसांप्रमाणेच प्राणी ( Animals ) देखील एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यामुळेच त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Animals Video on Social Media ) शेअर केले जातात, त्यापैकी काही व्हिडीओत ते एकमेकांना मदत करताना दिसतात. असाच एक अतिशय गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील म्हणाल की, प्राण्यांनाही एकमेकांबद्दल खूप प्रेम आणि माया असते. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान कुत्रा बदकाला मदत करताना दिसतो आहे. काही जण या व्हिडिओला गोंडस म्हणत आहेत, तर काहीजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. ( Video of a dog helping a duck goes viral on social media )

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बदक, जे उलटे पडलेले आहे आणि ते उठण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र प्रयत्न केल्यानंतरही ते उठू शकत नाही. त्याच वेळी, एक लहान गोंडस कुत्रा त्याच बदकाच्या जवळ बसलेला आहे, जो बराच काळ बदकाची धडपड पाहात आहे. पण, काही काळानंतर जेव्हा त्याला कळते की, बदक संकटात आहे, तो जवळ येतो आणि बदकाला उठण्यास मदत करतो. आणि बदक उठल्यानंतर तो छोटा कुत्रा त्या बदकाच्या जवळ बसतो.

प्रत्येकाला हा व्हिडिओ खूप आवडत आहे. हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एक छोटीशी मदत एखाद्याचं आयुष्य बदलू शकते.’ हा गोंडस व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या पेजवर पाहिला जात आहे.

लोकांना हा व्हिडिओ इतका आवडत आहे की, ते ते पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहत आहेत, व्हिडिओ खूप शेअरही होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. एका युजरनं व्हिडीओखाली लिहलंय की, ‘सर्व प्राणी प्रेमाची भाषा खूप चांगल्या प्रकारे समजतात! तर दुसऱ्याने लिहिलंय, ‘जे प्राण्यांना इतक्या लवकर समजतं, ते माणसांच्या लक्ष्यात कसं येत नाही?’

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.