मुंबई : प्रत्येक व्यक्ती काम करताना युक्तीचा वापर करते. मग तो प्राणी असो किंवा माणूस. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका डॉगीचा आहे आणि विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये हा डॉगी (Dog) चक्क मानसाप्रमाणे म्यूजिकल इंस्ट्रूमेंट वाजवतो आहे. तुम्ही नेहमीच मानसांना संगीत वाद्य वाजवताना बघितले असेल. मात्र, कधी डॉगीला म्यूजिकल इंस्ट्रूमेंट वाजवताना नक्कीच बघितले नसेल. मात्र, या व्हिडीओमध्ये चक्क एक डॉगी म्यूजिकल इंस्ट्रूमेंट वाजवतो आहे.
डॉगीचा म्यूजिकल इंस्ट्रूमेंट वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका डॉगीसमोर अनेक प्रकारची म्यूजिकल इंस्ट्रूमेंट ठेवण्यात आली आहेत. हा डॉगी एक-एक करून समोर ठेवण्यात आलेली सर्व म्यूजिकल इंस्ट्रूमेंट वाजवत आहे. कधी हार्मोनियम तर कधी सायरन वाजवतो. तो डॉगी म्यूजिकल इंस्ट्रूमेंट वाजवण्यासाठी आपल्या पायांचा आणि तोंडाचा वापर करताना दिसतो आहे. सुरूवातीला हा व्हिडीओ बघितल्यावर अनेकांना विश्वासच बसला नाही. मात्र, खरोखरच हा डॉगी म्यूजिकल इंस्ट्रूमेंट वाजवत आहे.
Best musician ever.. ? pic.twitter.com/PLdFruB5WE
— Buitengebieden (@buitengebieden_) February 13, 2022
इथे पाहा डॉगीचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @buitengebieden_ या नावाने शेअर करण्यात आला आहे आणि मजेदार पद्धतीने डॉगीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अवघ्या 39 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 7 लाख 44 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 42 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO : दोन हत्तींमध्ये झाली जबरदस्त फायटिंग, पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!