आज या ठिकाणी “समस्त बच्चे कंपनीच्या वतीने बदला” घेण्यात आलाय! व्हिडीओ पहा
यासंदर्भांतले इतक्या पद्धतीचे व्हिडीओ आहेत सोशल मीडियावर (Social Media) की आता ती वेळ आली होती जेव्हा एका तरी लहान मुलाने या सगळ्याचा बदला घ्यायला लागणार होता. शेवटी एक व्हिडीओ व्हायरल झालाय
तुम्ही कधी तुर्की स्टाइलमध्ये आईस्क्रीम (Turkey Style Ice Cream) खाल्लं असेल तर तुम्हाला समजेल की स्टाईल कशासाठी फेमस आहे. ही आईस्क्रीम हातात देताना इतकं फसवलं, घुमवलं जातं की बास्स. अनेकदा ती हातात दिल्यासारखी करतात आणि काढून घेतात. हा एक पद्धतीचा प्रॅन्क आहे. असे तुर्किश आईस्क्रीमचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झालेत ज्यात लहान मुलांवर हा प्रॅन्क केला जातो. यासंदर्भांतले इतक्या पद्धतीचे व्हिडीओ आहेत सोशल मीडियावर (Social Media) की आता ती वेळ आली होती जेव्हा एका तरी लहान मुलाने या सगळ्याचा बदला घ्यायला लागणार होता. शेवटी एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात एका लहान मुलाने त्याच्या समस्त समवयस्क बांधवांच्या वतीने बदला घेतलेला आहे.
व्हिडिओ
हा व्हिडिओ प्रसिद्ध बिझनेस मॅन हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. कॅप्शन देताना त्यांनी, “शेवटी तुर्कीच्या आईस्क्रीम विक्रेत्यांकडून अनेक वर्षांच्या छळानंतर या मुलाने बदला घेतलेला आहे.”असे कॅप्शनही दिले आहे.
Finally after years of teasing by Turkish ice cream vendors, this kid takes revenge …..???
— Harsh Goenka (@hvgoenka) September 3, 2022
आईस्क्रीम विक्रेत्याचा अपमान
हा मुलगा खूप चतुर असतो. तो ठरवूनच आलेला असतो, काहीही होऊदेत आपल्यावर प्रॅन्क होऊ द्यायचा नाही.जेव्हा दुकानदार आईसक्रीम द्यायला ती त्यांच्या स्टाईलची काठी पुढे करतो. तेव्हा हा मुलगा आईस्क्रीम नाही डायरेक्ट काठीच हिसकावून घेतो.
व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओने अनेक लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. इतकंच नाही तर कमेंट सेक्शनमध्ये लोकं इमोजी पोस्ट करत आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
फक्त 15 सेकंदाचा हा व्हिडिओ 2.5 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय.