देशात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही. काही लोकांच्या आत ती इतकी भरलेली असते, की पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटेल. विशेषत: जेव्हा काही जुगाड केलं जातं. तुम्ही सोशल मीडिया(Social Media)वर सक्रिय असाल तर देसी जुगाड(Desi Jugaad)चे एकापेक्षा एक व्हिडिओ (Video) तुम्ही पाहिले असतील. यापैकी काहींना पाहून तुम्हाला मनोरंजन होतं. काहींना पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट होऊन जाता. सध्या जुगाडचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झालाय. हा पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.
बॉक्सनं घेतलं झाकून
सध्या थंडीचं वातावरण आहे, अशा परिस्थितीत थंडीची लाट टाळण्यासाठी सर्वजण उबदार कपड्यांचा भार वाहताना दिसत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर दोन मुलांचा असा व्हिडिओ समोर आलाय, जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, व्वा काय जुगाड केलंय. व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन मुले दुचाकीवरून कुठेतरी जात आहेत. यादरम्यान बाइकच्या मागे बसलेल्या मुलानं थंडीपासून वाचण्यासाठी स्वतःला एका मोठ्या कार्टन बॉक्सनं झाकून घेतलंय. मुलानं बॉक्स अशाप्रकारे कापलाय, की त्याचा पुढचा भाग पूर्णपणे झाकलेला आहे. मुलाचा हा जुगाड पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.
21 हजारांहून अधिक लाइक
देसी जुगाडचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर _life.of.student_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. एका दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला 21 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलंय. पाहणाऱ्यांचं प्रमाण वाढतंच आहे.
व्हिडिओवर आल्या अशा कमेंट
एका यूजरनं कमेंट करताना लिहिलं, की हा जुगाड भारताबाहेर जाऊ नये. त्याचवेळी आणखी एक यूझर म्हणतो, की भाईचा जुगाड काय आहे. हे कोरोना आणि ओमिक्रॉन या दोन्हीपासून वाचवेल. आणखी एका यूझरनं कमेंट करताना लिहिलंय, की हा जुगाड फक्त भारतीयच करू शकतात.
काहींना कळलंच नाही
असे काही यूझर्स आहेत, ज्यांना व्हिडिओ पाहिल्यानंतरही मुलांची सर्जनशीलता जाणून घेता आली नाही. या व्हिडिओमध्ये काय होतं, असा सवाल ते अॅडमिनला करत आहेत. त्याचवेळी या गरिबीची खिल्ली उडवण्यात आली, अशी एका यूझरनं कमेंट केलीय.