मुंबई : कुत्रा आणि मांजरीशी संबंधित अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. यापैकी काहींमध्ये दोघांमध्ये भांडणं होतात, तर काही एवढे मजेशीर असतात की तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. सध्या कुत्रा (Dogs Video) आणि मांजरीशी (Cat Video) संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यामध्ये एरवी एकमेकांचे कट्टर वैरी मानले जाणारे दोन प्राणी एका घरात घुसण्यासाठी भन्नाट फंडा आजमवताना दिसून येत आहेत. इतर वेळी एकमेकांशी भांडताना एकामेकांवर तुटून पडणारे कुत्रा आणि मांजर या कामात मात्र एकमेकांना पुरेपूर मदत करताना दिसून येत आहेत. याची दरवाजा उघडण्याची स्टाईल बघून तर एकाता सराईत चोरही असा दरवाजा उघडू शकणार नाही, एवढी भन्नाट आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दोघे एकमेकांना मदत करत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये एकमेकांचे शत्रू म्हणवणारे मांजर आणि कुत्रा एकत्र आले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांजर आणि कुत्रा घराच्या ज्या भागात त्यांना प्रवेश बंद आहेत, त्या भागात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या खोलीचा दरवाजा त्यांच्यासाठी बंद करण्यात आला आहे. मांजर खूप हुशार दिसत असली तरी या कामात कुत्रा त्याला मागून साथ देताना दिसत आहे. समजूतदार मांजर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही दरवाजा उघडण्याची स्टाईल बघून नेटकऱ्यांनी याला दरोडा टाकण्याचा प्रयत्न म्हटलं आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मांजर बराच वेळ दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण यश मिळत नाही. यानंतर ती दरवाजाच्या कुलूपावर उडी मारून चढते. मांजर दरवाजाच्या कुलूपावर उडी मारताच ती उघडण्यात यशस्वी होते. त्यामुळे दोघेही चोरासारखे दार उघडून आतमध्ये प्रवेश करतात. हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. पेजवरील सर्व व्हिडिओ तुम्ही_more_pawsitive पाहू शकता. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने लिहिले – तिथे या दोघांची जोडी अप्रतिम आहे. आणखी एका यूजरने लिहिले – कुत्रा आणि मांजरीचा हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो इमोजीही पाहायला मिळत आहेत.