मेट्रोमध्ये केंद्रीय मंत्र्यास अशी वागणूक, निर्मला सीतारामन यांच्या मागून येणाऱ्या महिलेने… नेटकरी भडकले
nirmala sitharaman viral video in metro: सोशल मीडिया युजर्सने नाराजी व्यक्त केली आहे. एक मंत्री म्हणून नव्हे तर एक ज्येष्ठ महिला म्हणून निर्मला सीतारामन यांनी बसण्यासाठी जागा दिली पाहिजे होती. ज्येष्ठ महिला उभ्या आहेत आणि अनेक युवक बसलेले व्हिडिओत दिसत आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या साधेपणामुळे चर्चेत असतात. कधी सर्वसामान्य गृहिणीप्रमाणे ते भाजी घेण्यासाठी जातात. त्यांनी नुकताच दिल्लीत मेट्रोमधून प्रवास केला. त्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. एक केंद्रीय मंत्री म्हणून नव्हे तर 70 वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तीला बसण्यासाठी कोणी आपली जागा दिली नाही, याबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना निर्मला सीतारामन यांनी प्रवाशांसोबत संवादही साधला.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये निर्मला सीतारामन मेट्रोच्या डब्यात उभ्या असलेल्या दिसत आहेत. त्यानंतर काही सेंकदात एक महिला मागून येते. पुढे जाऊन ती महिला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या खांद्यावर थाप मारते. त्यानंतर ती महिला त्यांना बायबाय करताना दिसत आहे. निर्मला सीतारामन नवी दिल्लीतील लक्ष्मी नगर मेट्रो स्थानकावरुन प्रवास करत होत्या. त्यावेळी घेतलेला हा व्हिडिओ आहे.
This lady came and casually tap the shoulder of Indian Finance Minister 😀 pic.twitter.com/Ad6P6EXeCA
— Rishi Bagree (@rishibagree) May 18, 2024
सीतारामन यांची प्रतिक्रिया काय
व्हिडिओमध्ये महिलेने केलेल्या कृतीनंतर निर्मला सीतारामन यांनी स्मित हास्य करत प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर Rishi Bagree याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शन देताना म्हटले आहे की, ही महिला मागून येऊन मंत्र्यांच्या खांद्यावर थाप मारत आहे. हा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडिया युजर्सने नाराजी व्यक्त केली आहे. एक मंत्री म्हणून नव्हे तर एक ज्येष्ठ महिला म्हणून निर्मला सीतारामन यांनी बसण्यासाठी जागा दिली पाहिजे होती. ज्येष्ठ महिला उभ्या आहेत आणि अनेक युवक बसलेले व्हिडिओत दिसत आहेत. काही जणांनी लोकसभा निवडणुकीसाठी केलेले फोटो सेशन म्हटले आहे. आणखी एका युजरने अर्थमंत्र्यांचे सरकारी वाहन कुठे गेले? असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अकाउंटवर या मेट्रो प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत.