Video: ‘वडील वारले, व्हिसा हवाय’, म्हणणाऱ्या महिलेशी पाहा भारतीय अधिकारी कसा वागला? सोशल मीडियावर नेटकरी भडकले!
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला अधिकाऱ्याला म्हणताना ऐकू येते, 'वडील वारले आहेत, कृपया व्हिसा द्या...' माझ्या वडिलांचे एक दिवसापूर्वी निधन झाले. त्यावर अधिकाऱ्याने अर्ज परत करत 'तुमचे पैसे घ्या' असे सांगितले.
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ चर्चेत असतात, अलीकडच्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये एका महिलेला न्यूयॉर्कच्या वाणिज्य दुतावासात अतिशय वाईट प्रसंगाचा सामना करावा लागल्याचं दिसतं आहे. या कार्यालयातील एक भारतीय अधिकारी या महिलेवर इतका चिडले की, त्यांनी महिलेचा फॉर्मही खाली फेकून दिला आणि तिला व्हिसा देण्यास नकार दिला. अधिकाऱ्याचा ओरडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ( Video of Indian consulate loses his cool and scream woman in New York video Viral)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला अधिकाऱ्याला म्हणताना ऐकू येते, ‘वडील वारले आहेत, कृपया व्हिसा द्या…’ माझ्या वडिलांचे एक दिवसापूर्वी निधन झाले. त्यावर अधिकाऱ्याने अर्ज परत करत ‘तुमचे पैसे घ्या’ असे सांगितले. अधिकारी बोटे दाखवून ‘तुमचे पैसे ठेवा आणि निघून जा’ असे म्हणताना दिसत होते. स्त्री शेवटपर्यंत उभी असते. मात्र अधिकारी हे मान्य करत नाहीत.
हा व्हिडीओ पाहा
Disgusting rude behaviour by an Indian consulate officer in New York towards a woman applying for a visa to perform the last rites of her father. Who does he think he is. He’s a govt SERVANT hired to serve Indians not screw Indians. @IndianEmbassyUS @IndiainNewYork @DrSJaishankar pic.twitter.com/dLle0LPhIP
— Rakesh Krishnan Simha (@ByRakeshSimha) November 26, 2021
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 24 नोव्हेंबरची आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला 53 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1500 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. मात्र, छोट्या व्हिडिओ क्लिपमुळे अनेकांनी अधिकाऱ्याला पूर्णपणे जबाबदार धरणे टाळले आहे.
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, ‘भारतीय दूतावासात भारतीयासोबत असे वागणे पूर्णपणे चुकीचे आहे.’ तर दुसर्या युजरने लिहिले, ‘छोटी व्हिडिओ क्लिप असल्याने अधिकाऱ्याला पूर्णपणे जबाबदार धरणे टाळा.’
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, भारतीय दूतावासाने आपल्या अधिकृत हँडलवरून माहिती शेअर केली आणि लिहिले, ‘आम्ही या संदर्भात तक्रारीची दखल घेतली आहे. दूतावास जनतेच्या सेवेसाठी उच्च मानकांचे पालन करतो. सध्या कॉन्सुल जनरल यांनी स्वत: या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनंतर संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही पाहा:
Video: गोणीवर बॅक फ्लिप आणि गोणी पाठीवर टाकून थेट गोदामात, कामात मजा घेणारा मजूर पाहून नेटकरी भारावले!
Viral Video: पर्यटकांच्या गाडीवर हत्तींचा हल्ला, गाडी उलटवली आणि त्यानंतर जे झालं, त्याने अंगावर शहारे येतील!