Video : 50 हजारात तयार झालेल्या जीपचा व्हिडिओ आनंद महिंद्रांकडून ट्विट, दिली मोठी ऑफर
या लोकांनी साकारलेले हे यश आणि कमीत कमी साधनांचा उपयोग करुन बनवलेल्या या गाडीचे कौतुक आहे. मी त्यांना या जीपच्या बद्ल्यात बोलेरो देण्याची ऑफर देत आहे. अशा आशयाचे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील एका डोकेबाज पठ्ठ्यानं अवघ्या 50 हजारात एक छोटीशी जीप तायर केली आहे. त्या जीपची सर्वत्र चर्चा आहे. एवढेच नाही तर आनंद महिंद्रा यांनीही या जीपचा व्हिडिओ ट्विट केला आहे आणि या जीप बनवणाऱ्या अवलियाला बोलेरो ऑफर केली आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून यांचे चांगलेच कौतुक केले आहे. या मिनी जीपला किक मारून स्टार्ट करावे लागते. त्यानंतर ही सुसाट सुटते.
आनंद महिंद्रांच्या ट्विटमध्ये काय?
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, या लोकांनी साकारलेले हे यश आणि कमीत कमी साधनांचा उपयोग करुन बनवलेल्या या गाडीचे कौतुक आहे. मी त्यांना या जीपच्या बद्ल्यात बोलेरो देण्याची ऑफर देत आहे. त्यांच्या या क्रिएटीव्हीटीला महिद्रा रिसर्च वेलीत दाखवले जाईल. ज्यातून आम्हालाही प्रेरणा मिळेल. कारण हे कमीत कमी खर्चात जास्त काम केल्यासारखे आहे. आनंद महिद्रांनी शेअर केल्यानंतर या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी रिट्विट केला आहे.
This clearly doesn’t meet with any of the regulations but I will never cease to admire the ingenuity and ‘more with less’ capabilities of our people. And their passion for mobility—not to mention the familiar front grille pic.twitter.com/oFkD3SvsDt
— anand mahindra (@anandmahindra) December 21, 2021
कुणी साकारली सुपरहिट कार?
दत्तात्रय विलास लोहार (Dattatray Vilas Lohar). त्यांच्या बोलण्यावरुन तुम्हाला कुठेच त्यांनी इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलंय असं जाणवणार नाही. पण त्यांनी हे काम हे एखाद्या इंजिनियरलाही हे नाव आहे खतरनाक गाडी साकारणाऱ्या एका अवलियाचं. यांनी पॅशन बाईकचं इंजिन वापरुन एक चारचाकी कार साकारली आहे. कारचा लूक भारी व्हावा म्हणून जुन्या गंजलेल्या जीपचं बोनेटचा भाग घेतलंय. त्याला ठाकून-ठोकून, वेल्डिंग करुन आपल्या गरजेप्रमाणे कारचा लूक दिलाय. रिक्षाचे टायर घेऊन ते पुढे लावलेत.. पेट्रोलसाठीचा पंपही बसवलाय. या कारमध्ये इतर सर्सामान्य कारमध्ये जे-जे असतं, ते सगळंकाही आहे. स्टेअरींग (Steering), क्लच (Clutch), ब्रेक (Break), मॅन्युअल गिअर (Manual Gear Box) आणि एक्सलरेटरही (Accelerator) आहे. चार-पाच लोक सहज या कारमधून प्रवास करु शकतील, अशी याची रचना दत्तात्रय लोहार यांनी केली आहे. या मिनी जीपची सध्या सोशल मीडियावर जोरदार हवा आहे.