मुकेश अंबानीचे कुटुंब कुठे खेळतात गरबा अन् दांडिया, व्हिडिओ झाला व्हायरल…

Mukesh Ambani family: व्हायरल व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य दिसतात. त्यात नीता अंबानी, मुकेश अंबानी दांडिया खेळताना दिसत आहेत. तसेच मुकेश अंबानी यांची मोठी सुन श्लोका मेहता दांडियाचा आनंद घेताना दिसत आहेत.

मुकेश अंबानीचे कुटुंब कुठे खेळतात गरबा अन् दांडिया, व्हिडिओ झाला व्हायरल...
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 7:12 PM

नवरात्र उत्सव हा भक्तीचा आणि उल्हासाचा सण आहे. दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्ती, प्रार्थनेबरोबर नृत्य करण्याची परंपरा आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवात ठिकठिकाणी गरबा आणि दांडिया रास रंगलेला असतो. मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन गरबा आणि दांडिया खेळतात. त्यात तालबद्ध पथपद आणि दांडियाच्या काठ्यांचा वापर केला जातो. या उत्सावात सामन्य सहभागी होतात तसे बॉलीवूड सिताऱ्यांचाही सहभाग असतो. अंबानी कुटुंबातही नवरात्र उत्सव भक्ती अन् श्रद्धेने केला जातो. त्या काळात ते दांडियारासमध्येही सहभागी होतात.

जुलै २०२४ मधील हा व्हिडिओ

अंबानी कुटुंबाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. जुलै २०२४ मधील हा व्हिडिओ दांडिया खेळतानाचा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या पूर्वी झालेल्या सोहळ्यात अंबानी दांडिया खेळण्यात मग्न असताना त्यात दिसत आहे. अनंतच्या लग्नापूर्वी एका भव्य गरबामध्ये ते खेळत होते. हा कार्यक्रम मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन अंबानी यांनी आयोजित केला होता. हा उत्सव मुंबईमध्ये झाला.

हे सुद्धा वाचा

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये

व्हायरल व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य दिसतात. त्यात नीता अंबानी, मुकेश अंबानी दांडिया खेळताना दिसत आहेत. तसेच मुकेश अंबानी यांची मोठी सुन श्लोका मेहता दांडियाचा आनंद घेताना दिसत आहेत. गुजराती गाण्यावर ते दांडिया खेळत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. काहींनी हॅप्पी नवरात्री तर काही सुंदर व्हिडिओ असे म्हटले आहे.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी सर्व सण आणि उत्सव जोरात साजरा केले जातात. मुकेश अंबानी यांच्या घरात पूजा करणारे पंडितसुद्धा ठरले आहेत. पंडित चंद्रशेखर वर्मा त्यांच्याकडे नेहमी पूजेला असतात. पंडिच चंद्रशेखर शर्मा हे अनंत यांच्या लग्नातही पंडित होते.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...