VIDEO | बुडाखाली आग, उकळत्या पाण्याच्या कढईत ध्यानस्थ मुलगा, जुना व्हिडीओ व्हायरल, नेटिझन्सकडून ट्रिकचा भांडाफोड

भांड्यातील पाणी उकळत असूनही उष्णतेचा मुलावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. मुलगा ध्यानस्थ अवस्थेत हात जोडून काहीसे मंत्र पुटपुटताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

VIDEO | बुडाखाली आग, उकळत्या पाण्याच्या कढईत ध्यानस्थ मुलगा, जुना व्हिडीओ व्हायरल, नेटिझन्सकडून ट्रिकचा भांडाफोड
व्हायरल व्हिडीओचा स्क्रीनशॉट
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 3:11 PM

मुंबई : उकळत्या पाण्याच्या कढईत बसलेल्या एका ध्यानस्थ मुलाचा जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ बनावट असल्याचा दावा केला आहे. 30 सेकंदांच्या या क्लिपला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये आगीवर ठेवलेल्या एका भल्या मोठ्या भांड्यात एक लहान मुलगा शांतपणे हात जोडून बसलेला ‘दिसत’ आहे. मात्र जसं दिसतं तसं नसतं, असा दावा ट्विटर युझर्सनी केला असून जगाला फसगतीपासून सावध राहण्यास सांगितलं आहे.

“हा आहे 2021 चा भारत” असे कॅप्शन संदीप बिश्ट (@iSandeepBisht) नावाच्या ट्विटराईटने व्हायरल क्लिप शेअर करताना दिले आहे. भांड्यातील पाणी उकळत असूनही उष्णतेचा मुलावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. मुलगा ध्यानस्थ अवस्थेत हात जोडून काहीसे मंत्र पुटपुटताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

ट्विटराईट्सकडून टीकेची झोड

क्लिपमधील प्रेक्षक चिमुरड्याच्या स्टंटमुळे आश्चर्यचकित आणि इम्प्रेस झालेले दिसत आहेत, तर नेटिझन्सनी व्हिडिओला फेक असल्याचे म्हटले आहे. उकळत्या पाण्याचा भ्रम निर्माण करण्यासाठी पाण्याचा पंप वापरला गेल्याचा दावा एका ट्विटराईटने केला आहे, तर दुसऱ्याने ही एक साधी वैज्ञानिक स्पष्टीकरण असलेली जादूची युक्ती आहे, असं मत नोंदवलं आहे.

ही उच्च कोटीची फसवणूक आहे. कोणत्याही प्रकारची वाफ तयार होताना दिसत नाही किंवा भांड्यातील पाकळ्यांवरही कुठला परिणाम होताना दिसत नाही, असं एका व्यक्तीने म्हटलं आहे.

नेटिझन्सकडून पोलखोल

हे उकळणारे पाणी किंवा तेल नाही, परंतु एअर पंपने हवेचे बुडबुडे तयार केले जात आहेत, कढईला दुहेरी पृष्ठभाग आहे, जेणेकरुन तळभाग आगीमुळे गरम होणार नाही, असा दावा एकाने केला आहे.

व्हिडीओ कधी आणि कुठे काढला गेला हे स्पष्ट नसले तरी, या क्लिपची एक मोठी आवृत्ती 2019 मध्ये यूट्यूबवर पोस्ट केली गेली होती आणि त्यात असे शीर्षक होते की, “मुलगा एका उकळत्या पाण्याने भरलेल्या भांड्यात बसला आहे.”

पाहा मूळ व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की खोटा, याची सत्यता ‘टीव्ही9 मराठी’ने तपासलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल असलेल्या व्हिडीओ आणि दाव्यांच्या आधारे वृत्तांकन करण्यात आलेले आहे. ‘टीव्ही9 मराठी’ किंवा सदर पोस्टचे लेखक कुठल्याही अंधश्रद्धेचे समर्थन करत नाहीत. सोशल मीडियावर या व्हिडीओबाबत दिलेल्या कोणत्याही दाव्यां-प्रतिदाव्यांचे समर्थन किंवा पुष्टी ‘टीव्ही9 मराठी’ने केलेली नाही

संबंधित बातम्या :

VIDEO : किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न, भला मोठा फणा काढला, पळताभुई थोडी

देव तारी त्याला कोण मारी, दरड दुर्घटनेत दुचाकीस्वार बचावले, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.