Video : लग्नाच्या विधीत भटजींनी केला मोठा विनोद, नवरा-नवरीसह सगळेच पोट धरून लागले हसायला…

सोशल मीडियावर लग्नाशी संबंधीत दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. लग्नातील काही व्हिडीओ इतके खतरनाक असतात, की ते बघितल्यावर आपण हसल्याशिवाय राहूच शकत नाहीत. सध्या एका लग्नसोहळ्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Video : लग्नाच्या विधीत भटजींनी केला मोठा विनोद, नवरा-नवरीसह सगळेच पोट धरून लागले हसायला...
लग्नातील व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 8:33 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) लग्नाशी संबंधीत दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. लग्नातील (Wedding) काही व्हिडीओ इतके खतरनाक असतात, की ते बघितल्यावर आपण हसल्याशिवाय राहूच शकत नाहीत. सध्या एका लग्नसोहळ्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा लग्नातील खास व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाहीत.

नातेवाईकांसह सर्वजण हसायला लागले! 

लग्नात अनेक विधी केले जातात. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या विधींदरम्यान बऱ्याचदा मस्करी केली जाते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नाच्या वेळी सात शब्दांचे पठण करताना भटजी वधू आणि वराला असे काहीतरी बोलतात की, सर्वचजण हसायला लागतात. इन्स्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाऊंटवरून हा मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांनी लग्नाची शपथ आनंदाने ऐकली.’ हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. आत्तापर्यंत 3400 हून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकजण कमेंट देखील करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये लग्नाच्या विधीदरम्यान नवरी आणि नवरदेव हातात वाटी घेऊन काहीतरी पाहत आहेत. या दरम्यान नवरी वाटीमध्ये अतिशय लक्ष देऊन पाहते. तेव्हा भटजी म्हणतात की, काहीही उपयोग नाही हा आरसा नाहीये फक्त सावली दिसेल मेकअप दिसणार नाही. भटजीचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसू लागले होते.

संबंधित बातम्या : 

Viral video | माकड चाळे नक्की कशाला म्हणतात ‘हे’ पाहायचे आहे? मग हा व्हिडीओमध्ये बघाच!

VIDEO : रेड सिग्नलवर हेल्मेट बॉयचा बँग बँग गाण्यावर खास डान्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले हाच रियल डान्सर!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.