डोंगर दऱ्यांमध्ये रिल बनवण्यासाठी स्टंट, घडले असे की व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून युजर हैरान झाले आहे. काही जणांनी रिल बनवण्यासाठी धोकादायक स्टंट करु नका, असा सल्ला दिला आहे. लाईक्स आणि फॉलोअर्सपेक्षा आपले जीवन महत्वाचे आहे, असे काही युजरने म्हटले आहे. रिलसाठी झालेला हा पहिलाच अपघात नाही.
सोशल मीडियावर रिल बनवण्यासाठी काही जण अनेक धोकादायक प्रयोग करतात. केवळ आपल्या व्हिडिओला लाइक्स अन् व्यूज मिळवण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालतात. या स्टंटबाजीमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यानंतर त्यापासून धडा घेतला जात नाही. आता हिमाचल प्रदेशातील डोंगरांमध्ये रिल बनवण्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. चंबा येथे एक युवती डोंगरांमध्ये जाऊन धोकादायक पद्धतीने रिल बनवत आहे. त्यानंतर मात्र अपघात घडला आणि तिला प्राणास मुकावे लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय घडला प्रकार
व्हिडिओमध्ये एक युवती डोंगर दऱ्यांमध्ये रील बनवताना दिसत आहे. स्टार्ट आवाज येताच ती ‘बेपनाह प्यार है, तेरा इंतजार है…’ हे रोमँटिक गाणे म्हणू लागते. त्यानंतर ती युवती तिचा दुपट्टा हलवत डान्स स्टेप्स करते. त्याचवेळी तिचा चुकीच्या ठिकाणी पडतो अन् ती दऱ्यांमध्ये जाऊन पडते. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Today's people are playing with their lives just to make a reel. The viral video is said to be from Chamba. pic.twitter.com/QnaGGAZ1rJ
— Baba Banaras™ (@RealBababanaras) September 15, 2024
युजर्सकडून रिल बनवणाऱ्यांना सल्ले
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून युजर हैरान झाले आहे. काही जणांनी रिल बनवण्यासाठी धोकादायक स्टंट करु नका, असा सल्ला दिला आहे. लाईक्स आणि फॉलोअर्सपेक्षा आपले जीवन महत्वाचे आहे, असे काही युजरने म्हटले आहे. रिलसाठी झालेला हा पहिलाच अपघात नाही. यापूर्वी अनेक अपघात झाले आहे. त्यानंतर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु त्या प्रकरणातून धडा घेतला गेला नाही.
महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्यासाठी स्टंटबाजी करण्याचे व्हिडिओ समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन्ही हात सोडून गाडी चालवण्याचा युवतीचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर त्या युवतीला पोलिसांनी समजही दिली होती.