Pizza Scam! पिझ्झा आवडणारे सावधान
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने पिझ्झा तयार केला आहे पण ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधीच त्यात गडबड झाली.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर गोष्टी व्हायरल होतात. एकेकाळी लोक याचा वापर फक्त मेसेज पाठवण्यासाठी करत असत पण आता गोष्टी बदलल्या आहेत आणि लोक स्वतःच्या मनोरंजनासाठी याचा वापर करतात. यामुळेच येथे दररोज मजेशीर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते पाहिल्यानंतर खूप हसू येतं, तर अनेकदा हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही स्तब्ध व्हाल
पिझ्झा खायला कोणाला आवडत नाही? पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येते. वयाची संख्या कितीही असली तरी लोक पिझ्झासाठी वेडे असतात.
पण असे अनेक दुकानदार आहेत जे खास तंत्राद्वारे आपल्या ग्राहकांची फसवणूक करतात. आता ही क्लिप बघा जिथे एका दुकानदाराने पिझ्झा तयार केला पण हुशारीने ग्राहकाची फसवणूक केली.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने पिझ्झा तयार केला आहे पण ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधीच त्यात गडबड झाली आणि पिझ्झा एका स्लाइसने कमी झाला. ग्राहकाला त्याची माहिती नव्हती.
Pizza scam pic.twitter.com/99d2R64RLb
— Funnyman (@fun4laugh) January 30, 2023
@fun4laugh नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 1.68 लाख वेळा पाहिला गेला असून त्यावर कमेंट्स दिल्या जात आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, ‘ब्रदर स्कॅम एवढ्या दुष्ट पद्धतीने करण्यात आला आहे की, ग्राहकाला ते कळणारही नाही…’ तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘हा स्कॅम मार्केटमध्ये नवीन आहे आणि प्रत्येक पिझ्झाप्रेमीने यापासून सावध राहायला हवं.’