Video: देश शोकसागरात, भाजप आयटी सेलकडून प्रियंका गांधींच्या ‘डान्स’चा व्हिडीओ ट्विट, काँग्रेसचेही जशास तसे उत्तर
संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असतानाच प्रियंका गांधींच्या एका व्हिडीओवरुन राजकारण तापताना दिसतंय. भाजपची आयटी सेलनं हा व्हिडीओ प्रसारीत करत सवाल उपस्थित केलेत.
राजकारण कुठून सुरु होईल आणि ते नेमकं कुठे जाईल सांगता येत नाही. आता हेच बघा, सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधूलिका यांच्यासह 11 जणांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जीव गेलाय. त्यात काल सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीला एकाच चितेवर मुखाग्नी दिला गेला. दोन्ही मुलींनी एकत्र आई वडीलांचे अंत्यसंस्कार केले. संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असतानाच प्रियंका गांधींच्या एका व्हिडीओवरुन राजकारण तापताना दिसतंय. भाजपची आयटी सेलनं हा व्हिडीओ प्रसारीत करत सवाल उपस्थित केलेत.
काय आहे व्हिडीओत? प्रियंका गांधींचा व्हायरल व्हिडीओ (Priyanka Gandhi viral video ) भाजपचे आयटी सेलचे (BJP IT cell) इंचार्ज अमित मालवीय यांनी ट्विट केलाय. त्यात ते म्हणतात- जेव्हा 26/11 दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळेस राहुल गांधी सकाळपर्यंत पार्टी करत होते. आता भावाप्रमाणेच प्रियंका गांधीही गोव्यात नाचतायत. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातायत. संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय. यापेक्षा शर्मनाक काही असू शकतं? भाजपची आयटी सेल कामाला लागल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटणार नाहीत असं थोडंच होईल? ट्विटरवर यूजर्सनी ज्योतिरादित्य शिंदेंचे व्हिडीओ, फोटोज उत्तर म्हणून ट्विट करायला सुरुवात केली. यूजर्सनी लिहिलं- हे बघा भारत सरकारचे मंत्री शोक पाळत असताना.
When 26/11 happened, Rahul Gandhi was partying till wee hours of morning.
Like brother, Priyanka Vadra too is dancing away in Goa while the entire nation is mourning and steeped in sadness as CDS Gen Bipin Rawat is being cremated.
Can anything be more shameful than this? pic.twitter.com/hggjarFJdx
— Amit Malviya (@amitmalviya) December 10, 2021
काय आहेत ज्योतिरादित्य शिंदेंचे फोटो? गुरुवारी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ग्वाल्हेरच्या शंकरपूरमध्ये बनत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी बॅटींगही केली. एवढच नाही तर मैदानाची पळत एक चक्करही मारली. ह्याच घटनेची चर्चा प्रियंका गांधीच्या व्हिडीओनंतर चांगलीच जोर धरतेय.
ग्वालियर में निर्माणाधीन अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम का निरीक्षण किया।इस दौरान बल्ले से भी हाथ आज़माए। pic.twitter.com/yxoTOXGD3c
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) December 9, 2021
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शोक सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीवर काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या दोन्ही मुलींनी अंत्यसंस्काराची जबाबदारी जड अंत:करणाने पार पाडली. पती पत्नी म्हणून सात जन्माची सोबत करण्याचं एकमेकांना दिलेलं वचन त्यांनी शेवटच्या क्षणीही पाळलं. दोघांच्या पार्थिवाला एकत्रच मुखाग्नी दिला गेला. विशेष म्हणजे रावत आणि त्यांच्या पत्नी मधूलिका यांचा तामिळनाडूतल्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात एकाच वेळेस निधन झालं. त्यानंतर तीन दिवसांपासून देश शोकसागरात आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, रावत दाम्पत्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय. कुन्नूरला तसच पालम एअरपोर्टवर पार्थिव नेणाऱ्या आणणाऱ्या वाहनांवर लोकांनी पुष्पवृष्टी केली. अतिशय दु:खद भावनेनं देशानं सीडीएस रावत यांना निरोप दिला. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वाद उफाळताना दिसतोय.
हे सुद्धा वाचा: