काष्ठा साडी, डोक्यावर पदर आजीबाईंच्या ग्रुपची ‘पाव्हणं जेवला काय?’वर खतरनाक लावणी; सगळेच अवाक्

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये आजीबाईंच्या ग्रुपने 'पाव्हणं जेवला काय?' या गाण्यावर लावणी केली आहे. त्यांची ऊर्जा भले भले चाट पडलेले पाहायला मिळाले. सध्या हा व्हिडाओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होतं आहे,

काष्ठा साडी, डोक्यावर पदर आजीबाईंच्या ग्रुपची 'पाव्हणं जेवला काय?'वर खतरनाक लावणी; सगळेच अवाक्
Grandma's dance
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 12:28 PM

सोशल मीडिया म्हटलं की व्हिडीओ व्हायरल होणं आलं. त्यात डान्स व्हिडीओंची संख्या तर सगळ्यात जास्त असते. आता असाच एक व्हिडाओ प्रचंड व्हायरल होतं आहे. तो म्हणजे एका आजीचा. होय, एका आजीने एका कार्यक्रमात भन्नाट डान्स केला आहे आणि फक्त एकच आजी नाही तर आजीबाईंच्या ग्रुपचाडान्स केला आहे.

‘पाव्हणं जेवला काय?’वर आजीबाईंच्या ग्रुपची लावणी

सोशल मीडियावर एका कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ‘पाव्हणं जेवला काय?’ या गाण्यावर आजीबाईंच्या ग्रुपने भन्नाट डान्स केल्याचं दिसत आहे. या सर्व आज्यांनी काष्ठा घालून, डोक्यावरचा पदर खाली न पडू देता केलेला हा डान्स सध्या प्रचंड व्हायरल होतं आहे. एका कार्यक्रमात हे गाणं लावण्यात आलं या गाण्यावर या सर्व मैत्रिणी अगदी एनर्जीने डान्स करताना दिसून येत आहे. या गाण्यावरील त्यांचा डान्समुळे अनेकांना उत्साह दिला .

वयस्कर व्यक्ती म्हटलं की शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात. पण या आजींच्या ग्रुपने मात्र हा डान्स करून ‘वय हे फक्त आकडा असतो’ या वाक्याची आठवण करून दिली. कारण या सर्व आज्या इतक्या फिट आणि उत्साही दिसतात की तरुणांनीही लाजवतील. व्हिडीओमध्ये सगळ्याच आज्या ज्याप्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

आजींची एनर्जी पाहून सगळेच अवाक्

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये या ५,६ आजीबाई गर्दीच्या मधोमध येऊन मनसोक्त नाचताना दिसतायत. पाव्हणं जेवला का? या गाण्यावर आजीबाईंच्या ग्रुपने चांगलाच ठेका धरलेला दिसतो. विशेष म्हणजे एवढं मनसोक्त नाचतानाही डोक्यावरुन साडीचा पदर काही खाली आलेला नाही. या आजीबाईंचा उत्साह पाहून इतर तरुण महिलावर्गही अवाक् झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. सर्व महिला पुरुष टाळ्या वाजवत या आजीबाईंना प्रोत्साहन देत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर lavanipremi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजींच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.