तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे हे अत्यंत पवित्र कार्य मानले जाते. हे शिक्षण आपल्याला आपल्या पालकांकडून लहानपणीच मिळते. आजही बरेच लोक त्याचे पालन करतात, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना याची पर्वा नाही. आपण कुठेतरी फिरायला गेलात तर साहजिकच पाण्याची बाटली घेऊन जातो आणि कुणी पाणी मागितलं तर त्याला आपण नाही म्हणत नाही. आपण एखाद्याला मदत करणे हे एक चांगले काम आहे. जनावरांनाही पाणी पिऊन अनेकजण प्रेमभाव दाखवतात. असे अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस माकडाला पाणी देताना दिसत आहे.
बाटलीतलं सर्व पाणी पितो
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस माकडाला पाणी देताना दिसत आहे. माकडालाही खूप तहान लागली आहे. तो हळूच बाटलीतील सर्व पाणी पितो. लोक सहसा माकडांच्या जवळ जायलाही घाबरतात, तर ती व्यक्ती बिनदिक्कत हाताने माकडाला पाणी देत आहे, जसे लहान मुलाला पाणी दिले जाते. हा एक अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे, जो लोकांना खूप आवडतोय.
IAS अधिकाऱ्यानं केला शेअर
हा शानदार व्हिडिओ जलशक्ती मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे, जो IAS अधिकारी सोनल गोयल यांनी रिट्विट केला आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 40 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1500हून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.
जल है तो जीवन है !
प्यास सबको लगती है, गला सबका सूखता है।
इंसान, पशु, पक्षी- कोई भी हो, हर प्यासे को पानी पिलाएं। pic.twitter.com/Di69HnnucV— Ministry of Jal Shakti ?? #AmritMahotsav (@MoJSDoWRRDGR) January 8, 2022
यूझर्सकडून कौतुक
त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने ‘पाणी हे जीवन आहे’ असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूझरने ‘विश्वातील सर्व जीवांवर प्रेम करणे आपले कर्तव्य आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक यूझर्सनी कमेंट करून व्हिडिओला खूप चांगला असल्याचे म्हटले आहे.