Viral: आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही! अजगराने कांगारूच्या बाळाला पकडलं, कांगारू जीवाची पर्वा न करता अजगराला भिडलं
एक मादी कांगारू आपल्या बाळाला त्यापासून वाचवण्यासाठी एका महाकाय अजगराचा कसा सामना करते. या व्हिडिओमध्ये अजगर लहानग्या कांगारूला पकडून ठेवताना दिसत आहे. अजगराच्या तावडीतून स्वत:ला मुक्त करण्यासाठी मूल आटोकाट प्रयत्न करते, पण अपयशी ठरते.
आई म्हणजे ममताची मूर्तीच नव्हे, तर धाडसाचं दुसरं नावही आहे. आईसारखं आपल्या मुलाचं रक्षण कुणीच करू शकत नाही. हे मानव आणि प्राणी दोघांनाही लागू होते. आता हा व्हिडिओ व्हायरल होताना पाहा. महाकाय अजगर कांगारूच्या बाळाला पकडतो, तेव्हा आई जिवाची पर्वा न करता त्याचा सामना करते. हा व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर सगळे जण एकच गोष्ट सांगत आहेत- ‘या जगात आईपेक्षा मोठं कोणी नाही’. आपल्या मुलाला आईपासून (Mother) कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मग यमराजांसमोर का होईना आई उभी राहू शकते. आई आपल्या मुलाचे प्रत्येक शक्तीपासून रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक मादी कांगारू आपल्या बाळाला त्यापासून वाचवण्यासाठी एका महाकाय अजगराचा कसा सामना करते. या व्हिडिओमध्ये अजगर लहानग्या कांगारूला पकडून ठेवताना दिसत आहे. अजगराच्या तावडीतून स्वत:ला मुक्त करण्यासाठी मूल आटोकाट प्रयत्न करते, पण अपयशी ठरते. त्याचबरोबर मुलाला या परिस्थितीत पाहून मादी कांगारू थांबत नाही ती तिच्याही जीवाची पर्वा न करता भांडते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, मादी कांगारू आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावते.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
‘आईचे निःस्वार्थी प्रेम.’
wildtrails.in नावाच्या अकाऊंटसोबत हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आईचे निःस्वार्थी प्रेम.’ सुमारे दोन हजार लोकांना तो आवडला आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही आपल्या प्रतिक्रिया तीव्रपणे नोंदवत आहेत. एका युझरचं म्हणणं आहे की, तो मुलाचा बापही असू शकतो. त्याचवेळी आणखी एका युझरने कमेंट केली की, “ज्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यावर मी खूप रागावलो आहे. तर आणखी एका युझरने कमेंट केली की, “हे एक हृदयद्रावक दृश्य आहे. कोणतीही आई आपल्या मुलाला डोळ्यांसमोर मरताना पाहू शकत नाही. एकूणच हा व्हिडिओ पाहून लोकही भावूक होत आहेत.