मुंबई: लग्न ही कुठल्याही माणसासाठी मोठी संधी असते. ज्याची तयारी अनेक महिने आधीपासूनच सुरू होते. लग्न सोहळे परंपरांनी भरलेले असतात. यामुळेच सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. जे केवळ लोकांनाच दिसत नाही तर लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जोरदारपणे शेअर करतात. ते व्हायरल होतात. विशेषत: वधू-वरांशी संबंधित व्हिडिओ लोकांना प्रचंड आवडतात. अलीकडच्या काळात एक व्हिडिओ देखील लोकांमध्ये चर्चेत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल- या जोडप्याचे 36 पैकी 36 जुळलेले दिसतायत.
लग्नापूर्वी अनेक प्रकारचे विधी केले जातात. एकेकाळी फक्त नवरदेवाकडचे लग्नात परफॉर्मन्स द्यायचे, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. हल्ली परिस्थिती अशी आहे की, वधू-वरही आपल्या लग्नाचा मनमुराद आनंद घेतात. आता पाहा ही क्लिप जिथे वधू-वर नाचताना दिसत आहेत. बघताना तुम्हालाही मजा येणार आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वरमालाच्या विधीनंतर वधू-वर स्टेजवर उभे राहून नाचायला सुरुवात करतात. दोघंही स्टेजवर एकत्र डान्स करू लागतात. या क्लिपमध्ये दोघेही भोजपुरीच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
या परफॉर्मन्स दरम्यान हे विसरतात की त्यांचे कुटुंबीयही तिथे उपस्थित असतात. या कपलच्या या डान्सने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लाखो लोकांनी व्हिडीओ पाहिलाय आणि त्यावर कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया दिलीये.