प्रत्येक मराठी माणसाने तोंडपाठ करावी अशी महाराष्ट्राबद्दलची A टू Z माहिती, ‘हा’ मेसेज तुम्ही पाहिलाय का?
सोशल मीडियावर महाराष्ट्राबद्दल सविस्तर माहिती देणारा एक मेसेज चांगलाच व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये महाराष्ट्रात एकूण किती महापालिका आहेत, या पासून महाराष्ट्रातील पहिलं दैनिक वर्तमानपत्र कोणतं, याबाबतची सविस्तर माहिती आहे.
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यासह, देश आणि जगभरात या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्र आणि मराठी भाषेबाबत अभिमान वाटणं साहजिकच आहे. पण प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्राबद्दल थोडक्यात आणि अतिशय महत्त्वाची माहिती देखील असणं जास्त आवश्यक आहे. महाराष्ट्राची स्थापना कधीपासून झाली ते महाराष्ट्रात नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत किती आहेत? याची सविस्तर माहिती देणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमधील माहिती प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडपाठ असायला हवी अशीच आहे. खरंतर संबंधित मेसेज हा 1 मे महाराष्ट्र दिनापासून शेअर करण्यात आलाय. पण तो अजूनही सोशल मीडियावर व्हारल होतोय. संबंधित मेसेज तुम्ही देखील सोशल मीडियावर वाचला असेल. किंवा वाचला नसेल तर आपण इथे तो मेसेज आणि ती माहिती वाचू शकणार आहात.
मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
- माझा महाराष्ट्र – एक झलक
- ★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
- ★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
- ★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
- ★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
- ★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
- ★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
- ★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २९
- ★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २३२
- ★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : १२५
- ★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
- ★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
- ★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
- ★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
- ★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
- ★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
- ★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
- ★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
- ★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
- ★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
- ★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
- ★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
- ★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
- ★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
- ★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : पूणे
- ★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
- ★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
- ★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
- ★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
- ★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
- ★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
- ★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
- ★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
- ★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
- ★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
- ★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
- ★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा.एकनाथ शिंदे
- ★ महाराष्ट्राचे राज्यपाल : श्री रमेश बैस
- ★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
- ★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
- ★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
- ★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
- ★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
- ★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
- ★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
- ★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
- ★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
- ★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
- ★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
- ★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
- ★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
- ★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
- ★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
- ★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
- ★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
- ★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
- ★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
- ★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
- ★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
- ★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
- ★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
- ★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
- ★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
- ★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
- ★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
- ★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
- ★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
- ★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
- ★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
- ★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
- ★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
- ★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
- ★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
- ★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१८४९)
- (संबंधित सर्व माहिती खरीच असेल याची आम्ही पुष्टी करत नाहीत. संबंधित मेसेज हा व्हायरल मेसेज आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आपण अभ्यास करु शकता)