आतापर्यंत तुम्ही किती महागडं फळ खाल्लं आहे? या फळाच्या किंमतीत तुम्ही घर विकत घेऊ शकता!
आम्ही तुम्हाला अशाच एका फळाबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत लाखोंत आहे. हे फळ खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार कराल की, आपण हे फळ घेण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करू शकतो.
तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महाग फळ कधी खाल्लं आणि त्याची किंमत काय असेल? कदाचित ते 100 ते जास्तीत जास्त 1 हजार रुपयांपर्यंत असेल. पण एखाद्या फळाची किंमत लाखो रुपये असेल तर…? आपल्याकडे कांद्याचे भाव जरा वाढले तर सगळीकडे चर्चा सुरु होते. पण जगात फळं किती महाग विकली जातील याचा कधी विचार केला आहे का? आपण सर्वांनी सफरचंद, संत्री, द्राक्षे, आंबा खाल्ला आहे, पण लाखो रुपये किमतीचे फळ खाल्ले आहे का? (viral news precious fruit is more expensive than Diamond Expensive things )
सोन्याच्या किमतीपेक्षा महाग फळ
जगात अनेक धक्कादायक घटना घडत असतात, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. फॅन्सी फळे खाण्याची क्रेझही काही लोकांमध्ये दिसून येते, ज्याची किंमत 100 रुपयांपासून ते जास्तित जास्त 1000 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, आता आम्ही तुम्हाला अशाच एका फळाबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत लाखोंत आहे. हे फळ खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार कराल की, आपण हे फळ घेण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करू शकतो. होय, हे महागडे फळ खरेदी करण्यासाठी लोकांनी लिलावात भाग घ्यावा लागतो.
जपानचं सर्वात महागडं खरबुज
या फळाला युबरी खरबूज म्हणतात, हे आपल्याकडील खरबूजासारखंच आहे. हे जगातील सर्वात महाग फळ असल्याचे सांगितले जाते. हे फळ फक्त जपानमध्ये विकलं जातं आणि फक्त श्रीमंत लोकच ते विकत घेऊ शकतात. जपानचे युबारी खरबूज केवळ जपानच्या युबारी प्रदेशात पिकवलं जातं. यापैकी दोन युबारी कस्तुरी खरबूजांनी 2019 मध्ये विक्रमी किंमत मिळवली, जेव्हा त्यांचा $45,000 म्हणजे अंदाजे 33,00,000 रुपये. युब्री खरबुजासारखंच दिसतं,पण त्याची चव खूप गोड असते, ते आतून केशरी रंगाचं असतं.
हेही पाहा:
Video: विटा इमारतीवर नेण्यासाठी देसी जुगाड, स्कुटरचा वापर करुन भन्नाट आयडिया!
Video: अॅमेझॉनच्या डिलीव्हरी व्हॅनमधून तरुणी बाहेर पडली, व्हायरल व्हिडीओनंतर ड्रायव्हर सस्पेंड