मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र जर एखादी व्यक्ती चक्क 9 वर्ष झोपली तर… तुम्हाला हे खरं वाटणार नाही, अशी घटना घडली असल्याचं सांगितलं जातंय. ब्रिटनमध्ये (Britain) 150 वर्षांपूर्वी एक घटना घडली. त्यामुळे जगाला आश्चर्याचा धक्का बसला. एलेन सॅडलर (Ellen Sadler) ही मुलगी एका रात्री अशाप्रकारे झोपली की 9 वर्षांपासून ती झोपेतून उठू शकली नाही. ही तरूणी रात्री झोपली ती थेट 9 वर्षांनतर जागी झाली. ही मुलगी झोपली तेव्हा तिचं वय 12 वर्षे होतं आणि ती जेव्हा उठली तेव्हा तिचं वय 21 वर्षे झालेलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेपासून तिला ‘झोपाळू मुलगी’ (Sleeping Girl) अशी ओळख मिळाली. Medium.Com या साईटने याविषयचीचं वृत्त प्रसारित केलं आहे.
Medium.Com च्या रिपोर्टनुसार, 15 मे 1859 रोजी इंग्लंडमध्ये एलेन सॅडलर नावाच्या मुलीचा जन्म झाला. तिला एकूण 12 भावंडे होती. मुलीचे कुटुंब तुरविले नावाच्या गावात राहत होते. हे गाव ऑक्सफर्ड आणि बकिंगहॅमशायरच्या मधोमध वसलेलं आहे. या मुलीच्या जन्माच्या वेळी सगळं काही ठीक होते. परंतु जेव्हा ही मुलगी 12 वर्षांची झाली, तेव्हा एका रात्री ती झोपली ते थेट 9 वर्षांनी उठली. तिच्या या विचित्र झोपेमुळे जगभरातील डॉक्टर आश्चर्यचकित झाले. जेव्हा ही मुलगी झोपोतून उठत नव्हती तेव्हा तिचा मृत्यू झाला असावा असं कुटुंबियांना वाटं परंतू तिचा श्वासोच्छवास सुरू होता. त्यामुळे ताबडतोब तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. तेव्हा खूप प्रयत्न करूनही डॉक्टर काही करू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही मुलगी शितनिद्रा अवस्थेत गेली आहे.
ही मुलगी 9 वर्षांनंतर जेव्हा उठली तेव्हा तिच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. जेव्हा ती झोपली तेव्हा ती 12 वर्षांची होती आणि जेव्हा ती उठली तेव्हा ती 21 वर्षांची होती. मात्र, जेव्हा मुलीला जाग आली तेव्हा तिची आई मरण पावली होती.
टीप- टीव्ही 9 मराठी आपल्यापर्यंत केवळ माहिती पोहोचवत आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही.
संबंधित बातम्या