Video: भाऊ देशाचं रक्षण करताना शहिद, बहिणीची पाठवणी करायला CRPF चे जवान

शेअर केलेल्या फोटोंमध्ये 'गणवेशातील सैनिक' वधूला मंडपात नेत असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करताना, ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, मोठे भाऊ म्हणून, सीआरपीएफ जवान कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंग यांच्या बहिणीच्या लग्न समारंभाला उपस्थित होते.

Video: भाऊ देशाचं रक्षण करताना शहिद, बहिणीची पाठवणी करायला CRPF चे जवान
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 6:05 PM

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि अशात अनेक व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळत आहेत. त्यातच अशीही काही दृश्यं पाहायला मिळतात की, ते पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सध्या सोशल मीडियावर काही फोटो फिरत आहेत, ज्यामध्ये सीआरपीएफ जवानांचा ग्रुप दिसत आहे. हे सर्व कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंह यांच्या बहिणीच्या लग्नात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यात कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंह शहीद झाले होते. कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 110 व्या बटालियनमध्ये तैनात होते. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, कॉन्स्टेबल सिंग यांचे अनेक सहकारी उत्तर प्रदेशमध्ये त्याची बहीण ज्योतीच्या लग्नात आले आणि वधूच्या भावांची जबाबदारी पार पाडली. (Viral Photo of CRPF jawan colleagues attended sisters wedding who was martyrs in pulwama)

आता व्हायरल होत असलेले फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केले आहेत. सीआरपीएफ पेजवर तुम्ही हे फोटो पाहू शकता. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ‘गणवेशातील सैनिक’ वधूला मंडपात नेत असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करताना, ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, मोठे भाऊ म्हणून, सीआरपीएफ जवान कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंग यांच्या बहिणीच्या लग्न समारंभाला उपस्थित होते. 110 बटालियन CRPF चे कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंग यांनी 05/10/20 रोजी पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याला शौर्याने प्रत्युत्तर देताना सर्वोच्च बलिदान दिले. पोस्टला #GonebutNotForgotten असा हॅशटॅग करण्यात आला होता.

व्हायरल व्हिडीओ:

रिपोर्टनुसार, सर्व सीआरपीएफ जवानांनी वधूला आशीर्वाद दिले. शैलेंद्र प्रताप सिंह यांचे वडील म्हणाले, माझा मुलगा आता या जगात नाही, पण आता आमच्याकडे सीआरपीएफ जवानांच्या रूपात अनेक मुलं आहेत, जी नेहमी आमच्या सुख-दु:खात उभी असतात. हे फोटो सर्व सोशल मीडिया युजर्सद्वारे पसंत केली जात आहेत, एकत्र लोक त्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सद्वारे भरपूर पाऊस पाडत आहेत. सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर हे फोटो पाहायला मिळत आहेत.

या फोटोंवर एका युजरने कमेंट केली आणि लिहिले, खूप कौतुकास्पद काम, आमच्या CRPF जवानांनी त्यांच्या शहीद साथीदाराच्या बहिणीच्या लग्नात उपस्थित राहून प्रोत्साहन दिले आणि शहीदांच्या पालकांना अभिमान वाटला. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं…दुसऱ्या युजरने लिहिले, तुम्ही सर्वांनी खूप कौतुकास्पद काम केलं, त्या कुटुंबातील एक मुलगा, बहिणीचा भाऊ हरपला, पण तुम्ही सर्वांनी तिथं उपस्थित राहून ही कमी भरुन काढली. तुम्हाला मनापासून सलाम.

हेही पाहा:

‘आला अंगावर, घेतला शिंगावर’, बैलाच्या वाटेला जाणं म्हताऱ्याला महागात पडलं, पाहा Viral Video

Video: ‘माकडाला कळतं, कसं खायचं, तुला नाही!’, माकडाचा व्हिडीओ पाहून मित्रांना टॅग करणं सुरु!

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.