सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोत खरंच राहुल गांधी आहेत? जाणून घ्या खरं-खोटं

| Updated on: May 19, 2021 | 11:22 PM

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय (Rahul Gandhi Viral Photo)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या फोटोत खरंच राहुल गांधी आहेत? जाणून घ्या खरं-खोटं
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोत खरंच राहुल गांधी आहेत?
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर कधीही, काहीही व्हायरल होतं. मग तो फोटो असो किंवा व्हिडीओ. आतादेखील सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत एका व्यक्तीने एका मुलीला उचललं आहे. फोटोतील तरुण हा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आहेत, असा दावा काही लोकांकडून करण्यात आला आहे. त्यावरुन अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत (Rahul Gandhi Viral Photo).

फोटोतील मुलगी राहुल गांधी यांची गर्लफ्रेंड?

राहुल गांधी यांच्याबाबत सोशल मीडियावर नेहमी चर्चा होते. काही युजर राहुल यांच्याशी संबंधित जोक्स व्हायरल करतात. तर काही त्यांचे व्हिडीओ व्हायरल करतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय, ज्या फोटोतील मुलगी ही राहुल गांधी यांची गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे (Rahul Gandhi Viral Photo).

फोटोवर मीम्सचा अक्षरक्ष: पाऊस

या मजेशीर फोटोला Me and Who नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. हा फोटो समोर आल्यानंतर काही लोकांनी तर मीम्सचा अक्षरक्ष: पाऊसच पाडला आहे. तर दुसरीकडे इतर लोकंही आपापल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

खरं-खोटं काय?

खरंतर हा फोटो Fifty Shades of Grey या चित्रपटातल्या एका सीनचा आहे. लोक ज्या व्यक्तीला राहुल गांधी समजत आहेत तो खरंतर हॉलिवूडचा अभिनेता जॅमी आहे. राहुल गांधी यांची तुलना नेहमी जॅमीसोबत केली जाते. 2015 मध्ये जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा फिफ्टी शेड्स ऑफ ग्रेमध्ये राहुल गांधीच आहेत, असं काही लोक बोलत होते.

हेही वाचा : कोरोना महामारीत हा मुलगा नेटकऱ्यांचं मन जिंकतोय, या चिमुकल्याची सोशल मीडियावर चर्चा, फोटो एकदा पाहाच